ग्रीन फांऊंडेशनच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पदी अमेय अग्रहारकर यांची निवड

संजय महाजन
छत्रपती संभाजीनगर- ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाअध्यक्ष पदी सामाजिक कार्या मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे अमेयजी अग्रहारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष अमित जगताप व सचिव प्रतिक कोळपे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. पर्यावरण संरक्षण करणे, जनजागृती करणे, वृक्ष लागवड करणे, वृक्षाचे संवर्धन करणे, एक कुंटूब, एक झाड ही संकल्पना प्रत्यक्ष राबविणे. डोंगर परिसर,गायरान, शाळांमध्ये, महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन तसेच निंबंध स्पर्धा , वत्कत्व स्पर्धा,किल्ले स्पर्धा,चित्रकला स्पर्धा आयोजित करणे, निसर्गाच्या संलक्षाणासाठी विविध उपाययोजना करणे,झाडे लावा झाडे जगवा, वृक्ष चळवळ लोक चळवळ व्हावी यासाठी प्रयत्न करणार असे अमेयजी अग्रहारकर यांनी सांगितले