राजापूर महाविद्यालयात Organic Fertilizer कार्यशाळा उत्साहात………

संगमनेर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या सौजन्याने व प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला महाविद्यालय राजापूर दिनांक 10 मार्च 2023 रोजी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला.याअंतर्गत organic fertilizer कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
याप्रसंगी या शेतीतज्ञ तसेच परिस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद शांताराम देशमुख उपस्थित होते .त्यांनी organic fertilizer कशाप्रकारे आपल्याला उपयुक्त असतात आणि chemical fertilizer चा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर कसा होतो यासंबंधीचे मार्गदर्शन केले . तसेच organic fertilizer कशाप्रकारे काम करतात याचे देखील सखोल ज्ञान त्यांनी दिले.
.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष कडलग सर यांनी प्रास्तविक करून सर्वांचे स्वागत केले व आपल्या जीवनात या कार्यशाळेचा उपयोग करून यशस्वी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. भाऊसाहेब हासे यांनी या उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या.सूत्रसंचालन प्रा.वैभव गडाख यांनी केले व आभार प्रदर्शन विज्ञान विभाग प्रमुख प्रा.सुभाष वर्पे यांनी केले.विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व नॉन टिचींग स्टाफ यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रसायनशास्त्र विभागातील प्रा. अर्चना साबळे ,प्रा. स्नेहल पवार, प्रा. शितल वाळुंज प्रा. प्रल्हाद भालके त्याचबरोबर विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डाॅ.प्रवीण आहेर यांनी प्रयत्न केले