रिटघर ची “सुवर्णकन्या ” आर्या भोपी .ठरली राज्यस्तरीय सुवर्ण पदकाची मानकरी ठरली !

रायगड प्रतिनिधी
रिटघर गावची “सुवर्णकन्या ” आर्या भोपी .. हिस ..महाराष्ट्र भूषण ..श्री.राजू मुंबईकर यांनी केलं सन्मानीत !
पनवेल तालुक्यातील रिटघर गावचे.युवा सामाजिक कार्यकर्ते .रायगड भूषण.श्री.भारतदादा भोपी ( उपाध्यक्ष -आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा.संस्था महाराष्ट्र राज्य )… यांची सुकन्या कुमारी आर्या भारत भोपी…हिने अभिमानास्पद कामगिरी केली
भारतीय जम्प रोप महासंघ जम्प रोप असोसिएशन महाराष्ट्र…आणि नंदुरबार जिल्हा जम्प रोप अमैच्युअर असोसिएशन …आयोजित दुसरी राज्यस्तरीय जम्परोप स्पर्धा २०२२ …या स्पर्धेत रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतांना तिने आपल्या अतुलनिय खेळाचं प्रदर्शन करतं या राज्यस्तरीय स्पर्धेत…सुवर्ण पदकाची मानकरी ठरली !…
सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकणारी रिटघर … गावची ही ” सुवर्णकन्या” तिने राज्य स्तरांवर प्राप्त केलेल्या ह्या सोनेरी यशा मुळे आणि ..सोबतचगोवा.. येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झालेल्या आर्या भोपी हीचे सर्वत्र कौतुक होत आहे तिला नुकतेच तिला शाल,पुष्पगुच्छ… सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मानित केलं …केअर ऑफ़ नेचर सामाजीक.संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण श्री.राजू मुंबईकर हे या विशेष सन्मान सोहळ्या करिता उपस्थित होते ….आगरी,कोळी,कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्या चेउरण तालुका सचिवश्री.अनिल घरत आणि …शांतीवन नेरे येथील शांतीवन कुष्ठरोग निवारण समितीचे … .श्री.नीलकंठ कोळी आदी मान्यवरांनी मा.श्री.भारतदादा भोपी यांची सुवर्णकन्याआर्या भोपी हीचे अभिनंदन केले व तिला गोवा येथे निवड झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेच्या यशस्वी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.