पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी तरटे तर उपसभापती पदी बापू शिर्के !

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणूक 2023 मध्ये पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके ,माजी आमदार विजयराव औटी व नंदकुमार झावरे यांच्या एकमतातून राज्यात असणारी महाविकास आघाडी तालुक्यामध्ये सक्षमपणे स्वीकारून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 13जागा तर शिवसेनेला 5 जागा देण्याचा निर्णय झाला. झालेल्या निवडणुकीत खासदार सुजय विखे व महसुल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असतानाही महाविकास आघाडीच्या सर्व 18 जागा या प्रचंड मताधिक्याने जिंकल्या असून सभापतीपदी राष्ट्रवादीचे बाबाजी तरटे तर उपसभापतीपदी बापू शिर्के यांची वर्णी लागली. नेमणूक झालेल्या नवनिर्वाचित सभापती,उपसभापतींचा पदग्रहण समारंभ बुधवारी आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.सभापती प्रशांत गायकवाड सह नवनिर्वाचीत संचालक ,पारनेर नगर पंचायतचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व नगरसेवक यांच्या सह मा. पं.स.सभापती दिपक (आबा ) पवार , कारभारी पोटघन मेजर , रा.या.औटी, सचिन काळे , सत्येम निमसे अमोल यादव , सुपा उपसरपंच विजय पवार , किरन पवार , सुयोग दाते , सिध्देश खिलारी , पत्रकार मार्तंड बुचडे , विजय वाघमारे , उदय शेरकर , श्रीकांत चौरे सर्व संचालक मंडळ मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये पार पडला . पदभार स्विकारल्यानंतर पारनेर तालुक्यातील शेतकरी हितासाठी माझ्या पदाच्या कालावधीत वेगवेगळे उपक्रम राबवत आजी माजी आमदार व जेष्ठ संचालकांच्या मदतीने कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात एका वेगळ्या उंचीवर घेऊन जान्याचा माझा मनोदय आहे आसे नवनिर्वाचीत सभापती तरटे यांनी सांगीतले .
सभापती व उपसभापती कोण होणार यावर अनेक मातब्बर संचालकांनी मोर्चेबांधनी केली होती परंतु आ.निलेश लंके व मा.आमदार विजयराव औटी यांनी वरिष्ठ पातळीवर तालुक्याच्या भल्याचा विचार करत काही राजकीय आराखडे डोळ्यासमोर ठेवून सभापती व उपसभापती हे दोन्हीही पदे राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु महाविकास आघाडीमध्ये गुरु शिष्य जोडी एकत्र आल्यामुळे विरोधकांचा जळफळाट झाला असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शब्दांचा विपर्यास करत महाविकास आघाडीमध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा घनाघाती आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित उपसभापती बापूशेठ शिर्के यांनी केला आहे .
महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीत वरिष्ठ पातळीवर झालेली चर्चा ही कदाचित शिवसेना पदाधिकाऱ्यांना माहीत नसल्याने राष्ट्रवादीने शिवसेनेची फसवणूक केली अशा आशयाची बिनबुडाची माहिती काही पदाधिकाऱ्यांकडून समाज माध्यमांवर प्रसारीत झालेली दिसून आली परंतु त्यांना मी निक्षून सांगतो की तालुक्याची अस्मिता जतन करण्यासाठी व पारनेर तालुका हा स्वाभिमान्यांचा तालुका आहे हे सिद्ध करण्यासाठी पारनेर तालुक्यात एकत्र आलेल्या राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाच्या माध्यमातून झालेल्या महाविकास आघाडीमध्ये पारनेर नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना व शिवसेनेचे फक्त तीनच सदस्य आसतना सौ.शेख यांना महिला व बालकल्याण या महत्वाच्या समजल्या जानाऱ्या समितीच्या सभापतीपदी वर्णी लावत उर्वरित नगरसेवकांना इतर समित्यांमध्येही सदस्य करून घेत मनाचा मोठेपणा निलेश लंके दाखवू शकतात हे विरोधकांना मी निक्षूण सांगतो .माजी आमदार विजयराव औटी व विद्यमान आमदार निलेश लंके यांचे वैचारिक देवाणघेवाण असल्यामुळे सर्वांमते हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरु शिष्य एकत्र आल्यामुळे भविष्यातील राजकीय आराखडे उध्वस्त झाल्याकारणाने विरोधक चुकीच्या पद्धतीचे भांडवल करत आहेत असेही यावेळी बापू शिर्के यांनी सांगितले .
यावेळेस सदर पदग्रहण समारंभास निवडून आलेले संचालकांसह महाविकास आघाडीतील अनेक नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते बाजार समितीचा कर्मचारीव्रूंद पत्रकार व शेतकरी बंधू यावेळी उपस्थित होते .
पदांबाबत आमचे काही ठरले नव्हते – औटी
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात झालेल्या महाविकास आघाडी संदर्भात कुणाला कुठले पद द्यायचे याबाबत कुठलीही चर्चा झालेली नव्हती.तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे सर्व निर्णय मीच घेत असतो .तेव्हा सभापती व उपसभापती पदावर कुणीही नाराज होण्याचे कारण नाही .यासंदर्भात कुणी काही प्रतिक्रिया दिली हे महत्त्वाचे नाही.मा.आमदार विजयराव औटी
महाविकास आघाडीत कुठलीही नाराजी नाही – भोसले
कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी घवघवीत यश मिळवत सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले आहेत .सभापती उपसभापती असा निर्णय आजी-माजी आमदारांनी विचार करून घेतला असला तरी पद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये थोडा नाराजीचा सूर होता परंतु मा.आमदार औटी साहेबांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे तो दूर झाला आहे .महाविकास आघाडी अभेद्य आहे.आज सभापती उपसभापती पदाच्या पदग्रहण समारंभासाठी मी उपस्थित राहणार होतो परंतु माझ्या काही वैयक्तीक कामांमुळे मी उपस्थित राहू शकलो नाही याचा कुणी चुकीचा अर्थ काढू नये यापुढील काळात महाविकास आघाडीत एक विचाराने काम करून येत्या काही दिवसात पारनेर तालुक्याला वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न सर्व नक्कीच करणार आहोत.
श्री.रामदास भोसले
जिल्हा उपप्रमुख, शिवसेना ठाकरे गट:
तालुका महाविकास आघाडीच्या निर्णयावर समाधानी – शिर्के
येत्या पाच वर्षात आमदार निलेश लंके व मा .आमदार विजयराव औटी तसेच नंदकुमार झावरे यांच्या नेतृत्वाखाली या पुढे सर्वांना न्याय मिळणारच आहे .तेंव्हा महाविकास आघाडी ही अभेद्य आहे .त्यात कुठलेही रुसवे फुगवे किंवा नाराजी नाही.शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह जनता ही महाविकास आघाडीच्या निर्णयावर समाधानी आहे असे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व नेते मंडळी सांगत असतानाही पारनेर तालुक्यात राजकीय तेढ निर्माण करत या स्वाभिमानी तालुक्यात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे .आपल्याला जनतेने नाकारले या नैराश्यापोटी विरोधक महाविकास आघाडी मध्ये लुडबुड करत आहेत .ते त्यांनी थांबवावे कारण जनता आता सुज्ञ झाली आहे . यावेळेस पराभवाला तर सामोरे जावे लागलेच आहे .पण तुम्ही जर असेच महाविकास अघाडी मध्ये षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला तर भविष्यात जनता तुम्हाला रस्त्यावर आणल्या शिवाय राहणार नाही !बापूशेठ शिर्के
( उपसभापती पारनेर बाजार समिती ):
वरिष्ठ संचालकांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसाठी काम करणार – सालके
मी एक शेतकरी पुत्र आहे शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत,अडचणी काय आहेत हे मी जवळून पाहत आलो आहे फार दिवसापासून माझे स्वप्न होते की बाजार समितीचे नेतृत्व करावे माझ्या शेतकरी बांधवांना न्याय कसा मिळवुन देता येईल त्यासाठी प्रयत्न करणार व आमदार लंके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला ती संधी मिळाली या पुढील माझ्या कार्यकालात मी निवडून आलेल्या ज्येष्ठ संचालकांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांसाठी माझ्या पदाचा उपयोग करेल !श्री .संदीप सालके
(संचालक – कृषी उत्पन्न बाजार समिती )
