नवोदय प्रवेश परीक्षेत नेवासा तालुक्याचे घवघवीत यश !

दत्तात्रय शिंदे /माका प्रतिनिधी
नुकताच नवोदय प्रवेश परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला या निकालामध्ये अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्याने बाजी मारली आहे.
नेवासा तालुक्याचे सर्वाधिक म्हणजे तेरा विद्यार्थ्यांची नवोदय मध्ये निवड झाली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा येथे कार्यरत असलेले गेल्या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री रविंद्र पागिरे यांच्या वर्गातील तब्बल सात विद्यार्थ्यांची तर त्यांच्याच पत्नी श्रीमती लतिका कोलते-पागिरे या फुलारी वस्ती शाळेत कार्यरत असून त्यांच्याही दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयात निवड झाली आहे.
एकूणच दोघांनी मिळून नवोदय ला 80 पैकी नऊ विद्यार्थी पाठवले आहेत. सौंदाळा आणि फुलारी वस्ती या दोन्ही शाळा भेंडा केंद्रामध्ये असून या उत्कृष्ट निकाल परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे.
आज पर्यंत कुठल्याही शाळेचे एकाच शैक्षणिक वर्षात तब्बल इतके विद्यार्थी नवोदयला निवड होण्याची ही इतिहासात जिल्ह्यात पहिलीच घटना आहे.यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा या शाळेतून वेदांत ठाणगे, स्वानंदी ठाणगे, आदित्य पागिरे, सार्थक मिसाळ, ओम कदम, शरयू आंधळे व सिद्धी गवांदे अशा सात विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या सात विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक म्हणून श्री रवींद्र पागिरे सर यांनी मार्गदर्शन केले. तर सौंदाळा शाळेतील इतर सहकारी शिक्षक श्री कल्याण नेहुल सर श्री राजेश पठारे श्री किशोर विलायते श्रीमती कल्पना साठे श्रीमती कल्पना निघोट शाळेचे मुख्याध्यापक श्री पंढरीनाथ घुले या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच भेंडा केंद्रातीलच फुलारी वस्ती या शाळेतील सेजल पंडित व विराज कोलते या दोन विद्यार्थ्यांची नवोदय साठी निवड झालेली आहे
या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका म्हणून श्रीमती लतिका कोलते पागिरे त्याचप्रमाणे शाळेतील सहकारी शिक्षक श्री रवींद्र बांगर श्रीमती मंगल मुळे श्रीमती संगीता नळे त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका श्रीमती रेखा फंड यांचे मार्गदर्शन मिळाले.
या सर्व विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळात सकाळ व संध्याकाळ अशा दोन वेळी ऑनलाईन क्लास घेतले जात होते. इयत्ता चौथी पासूनच या वर्गाची तयारी सुरू केली होती. गेल्या दीड ते दोन वर्षाची प्रचंड मेहनत घेऊन हे वर्ग तयार झाले होते. तसेच एकूण नवोदय परीक्षेचे 80 सराव पेपर शाळा स्तरावर घेण्यात आले होते. इतक्या प्रचंड प्रमाणात सराव घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णपणे परीक्षेचा अंदाज व आवाका आला होता. प्रश्नातील विभिन्नता वगैरे सर्व विद्यार्थ्यांनी प्रभुत्व मिळवले होते.
श्री रवींद्र पागिरे वर्गशिक्षक
अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सरावाप्रमाणेच सुरुवातीपासून तयारी आवश्यक असते. अचानक केलेली प्रयत्न सराव हा यश मिळवून देऊ शकत नाही.
श्रीमती लतिका कोलते-पागिरे
सौंदाळा शाळेतील विद्यार्थी दरवर्षीच शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेत यशस्वी होत आहेत त्यामुळे भेंडा परिसरामध्ये सौंदाळा हे शिष्यवृत्ती आणि नवोदयची तयारी करून घेण्याची माहेरघर बनले असून परिसरातील सर्व गावातील म्हणजे नेवासा मधून सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. या सर्व जडणघडणीमध्ये भेंडा केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती मीरा केदार मॅडम यांचे पर्यवेक्षीय यंत्रणेद्वारा कायमच मार्गदर्शन असते.
ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे या विद्यार्थ्यांचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहेत, त्याचप्रमाणे या सर्व विद्यार्थ्यांना नवोदय सारख्या दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या या दांपत्याचा कौतुक करावे होतआहे.
या सर्व प्रक्रियेमध्ये केंद्रप्रमुख श्रीमती केदार मॅडम तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती येणारे मॅडम, श्रीमती आडेप मॅडम, तसेच तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी श्रीमती सुलोचना पठारे मॅडम यांचे कायम मार्गदर्शन लाभले.
नेवासा तालुक्याला एका वेगळ्या शैक्षणिक उंचीवर नेण्यामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रयत्नामुळे यावर्षी नवोदय परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे 80 पैकी 13 जागा मिळवून आघाडी घेतली आहे.