कोतुळ ग्रामीण रुग्णालयाचे भौतिक आरोग्य बिघडलं!

कोतुळ प्रतिनिधी
कोतुळ आणि परिसरातील मोठे कार्यक्षेत्र असणाऱ्या कोतूळ ग्रामीण रुग्णालयाचे भौतिक आरोग्य बिघडले आहे चाळीसगाव डांग परिसरातील अनेक खेड्यापाड्यांचे नागरिकांना या ठिकाणी उपचारासाठी यावे लागते मात्र गैर सुविधांमुळे या ग्रामीण रुग्णालयाचे भौतिक आरोग्य मात्र बिघडले आहे वरिष्ठांनी यात वेळीच लक्ष घालण्याची मागणी केली आहे
येथील ग्रामीण रुग्णालयात मोठा कर्मचारी वर्ग असून कर्मचारी वर्गातील बेजबाबदारपणा मुळे तसेच रुग्णांशी उद्धट वर्तणुकीमुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार खटके उडत असतात. अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने या रुग्णालयातील कर्मचारी बेशिस्त आणि बेजबाबदार पणाने वागत असल्याचे दिसून येत आहे. लाखो रुपये या रुग्णालयावर खर्च होत असताना कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तुनुकि मुळे मात्र रुग्णांची हेळसांड होत असून रुग्ण खाजगी दवाखान्याकडे वळत आहे
ग्रामीण रुग्णालयाचा परिसर चारही बाजूने संरक्षक भिंतीमुळे बंदिस्त असला तरी दर्शनी भागात असणारे दोन्ही गेट रात्रभर उघडे असतात रात्रीच्या वेळेस अनेक दारुड्यांचा या भागात संचार असतो सायंकाळ नंतर गांजा – दारू पिणाऱ्यांचे बैठकीचे ठिकाण व खाजगी वाहने पार्किंग म्हणून ग्रामीण रुग्णालयाच्या आवाराचा वापर होत आहे रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था देखील बेभरोशाची बनली आहे दारुड्ड्यांच्या बैठकांमध्ये रुग्णालयातील काही कर्मचारी सहभागी होत असतात रात्रभर गेट उघडे असल्याने बिबट्यांची दहशत रुग्ण व नातेवाईक तसेच निवासी कर्मचाऱ्यांना सहन करावी लागते दोन्ही गेट रात्रभर उघडे असतात काही दिवसापूर्वी याच रुग्णालयात दोन बिबट्यांनी घुसून कुत्र्यांचा फडशा पाडला होता आवारात असणारे विजेचे खांब मृत अवस्थेत आहेत एकाही विजेच्या खांबावर विजेचा प्रकाश चकाकत नाही वीज व सौर उर्जेवर चालणारे दिवे यावर लाखो रुपये खर्च केले मात्र एकही सौर ऊर्जा दिवा सुरू नाही काहींचे पॅनल फुटले तर काहींच्या बॅटऱ्या चोरीला गेलेल्या दिसून येतात कोतुळ ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो पुरेशा पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आवारातील झाडे उन्हाने काळवंडली आहेत

या ठिकाणी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असावी नळ योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णालयाला पाणीपुरवठा केला जातो मात्र तो पाणीपुरवठा अपूर्ण आहे
यासाठी रुग्णालयासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा टाकी किंवा कुपनलिका असावी अशी मागणी करण्यात आली आहे रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीचा होणारा खर्च ही संशयास्पद आहे ग्रामीण रुग्णालयावर लाखो रुपये खर्च होत असताना हे रुग्णालय शोभेची वस्तू न होता सर्वसामान्य नागरिकांना न्याय व सेवा देणारे रुग्णालय व्हावे अशी अपेक्षा रुग्णांकडून व्यक्त केली जात आहे



