मराठा समाजाचे १२ मुख्यमंत्री झाले. तरी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? -प्रा. संतोष विरकर :

अकोले प्रतिनिधी
राज्यात आतापर्यंत मराठा समाजाचे १२ मुख्यमंत्री झाले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही? कारण केंद्रीय मागास आयोग आणि राज्य मागास आयोग यांनी मराठा आरक्षण नाकारले.असल्याचे मतअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राज्याचे प्रवक्ते प्रा. संतोष विरकर यांनी व्यक्त केले .
अकोले समता परिषदेच्या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक
अकोल्यात मेहेत्रे हाईट्स शेकईवाडी येथे पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे होते.
वीरकर पुढे म्हणाले की राज्यात आजवर ५८ लाख कुणबी दाखल्यांचे वितरण झाले आहे, तसेच मराठ्यांना ईएसडब्ल्यू, ए.सी.बी.सी., सारथी तसेच उरले-सुरले सर्वसाधारण प्रवर्गातून शैक्षणिक आरक्षण मिळत आहे. असे असताना मराठा समाजाला ओबीसींमधूनच आरक्षण का पाहिजे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला
मंडल आयोगाने ओबीसी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला. त्यामुळे ओबीसी माणूस सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा
परिषद सदस्य, सभापती झाला. आजही ओबीसी समाजातील अनेक जाती वंचित, उपेक्षित आहेत.खऱ्या
अर्थाने त्यांना आरक्षणाची गरज आहे. मात्र, त्यात आता मराठा आल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले, असे विरकर
म्हणाले. महाराष्ट्राच्या विधी मंडळात मराठा आमदार किती आणि ओबीसी आमदार किती आहेत, हे बघितले तर मराठा आमदारांची संख्या मोठी असल्याचे दिसेल. आजही अनेक साखर कारखाने,
बँका, पतसंस्था त्यांच्याकडेच आहे. ओबीसी समाजाकडे काय आहे? असा सवाल विरकर यांनी केला, तसेच राज्यात ५८ लाख कुणबी दाखल्यांचे वितरण झाले असून, आता आणखी मराठा समाज ओबीसींमध्ये आल्यावर मूळ ओबीसी कुठे असेल? येणारा काळ ओबीसींसाठी खूप कठीण असून आ ओबीसी समाजाने एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, असे विरकर म्हणाले.

महात्मा फुले समता परिषदचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला सर्वच क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. परंतु तरी ते ओबीसींमध्ये येण्याचा आग्रह का धरत आहे, आगामी काळात ओबीसी आरक्षण बचाव आरक्षण लढ्यासाठी तीव्र संघर्ष करावा लागणार आहे या लढ्यासाठी मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली यापुढे येणाऱ्या प्रत्येक संघर्ष लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले
लवकरच जिल्हा स्तरीय ओबीसी मेळावा
राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरला प्रखर विरोध करण्यासाठी ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी सकल ओबीसी परिषदेचा भव्य जिल्हाव्यापी मेळावा संगमनेर येथे घेणार आहे. सुमारे एक लाख ओबीसींचा हा मेळावा असेल. ओबीसी समाज एकवटला असून आता त्यांना कोणीही रोखू शकणार नाही, असे यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे यांनी सांगितले
यावेळी समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे, कुंभार समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बोरुडे, गुरव समाजाचे जिल्हा अध्यक्ष अशोक पांडे, परिट महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मनोज गायकवाड, अगस्ती कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब ताजणे, वसंतराव बाळसराफ, नगरसेवक प्रमोद मंडलिक,प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन भास्कर मंडलिक संतोष मुतडक मच्छिंद्र मंडलिक, नितीन बेनके, राहुल जावळे, रावसाहेब जावळे, बाळासाहेब जावळे, धनंजय दुधाळ, सागर शिरसाठ, बाळासाहेब वाकचौरे रावसाहेब कदम, विनोद बोरुडे, रामनाथ शिंदे, भाऊसाहेब मंडलिक, उज्ज्वला राऊत, साधना अभंग,नवनाथ गायकवाड,किशोर झोडगे सचिन गिते प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब मेहेत्रे यांनी केले, तर आभार वसंत बाळसराफ यांनी मानले. यावेळी अकोले तालुक्यातील सकल ओबीसी समाज व समता परिषदेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
———



