इतर

अकोल्यातील ज्ञानवर्धिनी शाळेत सुविचारांची दहीहंडी

       सुविचारांची दहिहंडी ज्ञानवर्धिनी प्राथमिक व बालकमंदिर शाळेत संपन्न झाली... .... विद्यार्थ्यांचा भाषिक विकास व्हावा, वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच सुविचारातून प्रेरणादायी विचारांची पेरणी व्हावी या दृष्टीने हा उपक्रम घेण्यात आला . परिपाठात सुविचारांचे वाचन विद्यार्थ्यांनी केले..सर्व शिक्षकांनी मिळून  तयारी केली ..

अकोले – गोपाळकाला ( दहिहंडी उत्सव ) श्रीकृष्ण (कान्हाचा ) वाढदिवस ..! शाळेत प्रत्येक बालमित्राचा वाढदिवस होतो . मग कान्हाचा का नाही ? आज बरेच बालकृष्ण छान वेशभूषेत आवरून आले . देवकी आणि यशोदेची भूमिका सर्व पालकांनी सांभाळली . आज पाऊस असल्याने शाळेच्या प्रत्येक गॅलरीत दहिहंडी होती . बूब रंगमंच आणि प्रत्येक गॅलरी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सजवली . छान फोटोसेशन केले . मा . दिलीपजी शहा ‘ मा . प्रतिमा कुलकर्णी ‘ मा . सतिषजी बूब ‘ मा . सुधाताई देशपांडे , मा . योगेश देशमुख , या सर्व शालेय मान्यवर पदाधिका ऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी वेळ दिला . काल्याचा महाप्रसाद विद्यार्थ्यांना दिला गेला . संध्याकाळी ग्राऊंडवर मोठी दहिहंडी लावली . रेकॉर्डवर गाणी सर्व बालगोपाळ आणि स्टाफ तसेच पालकांनीही आनंद घेतला . सुट्टी रद्द झाली . पण … अभ्यासही झाला आणि आनंदोत्सवही साजरा झाला . कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक रावसाहेब नवले सर, दिलशाद सय्यद,बाळासाहेब मांडे, सोनली मालवणकर, शकीला पठाण, किरण शेळके,स्वाती कोते, सुचेता फटांगरे, योगेश नवले, मनिषा दिघे, सुवर्णा बाचकर , दिपाली कचरे , वैशाली पाटेकर, प्रतिभा वाघमारे, सुनंदा गायकवाड , सुनिता शिंदे , प्रांजल शाळीग्राम , अनिता चौधरी ,वैशाली मोहिते, कोकणे ताई यांनी प्रयत्न केले ….

..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button