ह.भ.प.सौ.गीताबाई लोखंडे यांनी केला क्लासवन अधिकाऱ्याचा सत्कार!

अकोले प्रतिनिधी
…राहुरी तालुक्यातील ताहराबाद देवस्थानच्या विश्वस्त व प्रवचनकार ह. भ. प. गिताबाई मोहनराव लोखंडे यांनी नुकत्याच एम पी एस सी परीक्षेत उत्तीर्ण होऊन मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर निवड झालेल्या कोतूळ येथील शिवा अशोक शेळके यांचा कौटुंबिक सत्कार केला, जिद्दीने आणि ध्येय ठेऊन प्रयत्न केल्यास निश्चित यश मिळते असे मत यावेळी ह भ प गीताबाई लोखंडे यांनी व्यक्त केले
सौ. गिताबाई लोखंडे ह्या कोतूळ येथील पत्रकार सुनील रामनाथ गीते, यांच्या सासूबाई असून, शेळके परिवारासोबत त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत . शिवा शेळके यांच्या निवडीचे वृत्त कळताच त्यांनी कोतूळ येथे येऊन सर्वसामान्य परिस्थितीतुन यशाचे उंच शिखर गाठणाऱ्या शिवा अशोक शेळके यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शिवाचे पुढील वाटचालीसाठी त्यांनी आशीर्वाद देऊन मार्गदर्शन केले, यावेळी शिवाने त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले,कठोर परिश्रमा शिवाय यश मिळत नाही जिद्दीने आणि ध्येय ठेऊन प्रयत्न केल्यास निश्चित यश मिळते असे यावेळी प्रवचनकार ह भ प सौ.गीताबाई लोखंडे यांनी यावेळी सांगितले
भारतीय संस्कृती चे जतन करून त्याला उत्तम संस्काराची जोड देऊन गोरगरीब जनतेची सेवा, आईवडिलांची सेवा शिवा शेळके यांचे हातून आपल्या सेवा काळात घडावी अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली
—–/-//——