शिर्डीत विठ्ठल रुख्मिणी मंदिरात संत कवी दासगणू महाराज यांची पुण्यतिथी संपन्न…!

_____________
शिर्डी प्रतिनिधी
(संजय महाजन)
श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, शिरडी. येथे गुरूवार दि.२८/११/२०२४. रोजी. सायं. ६.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला….यावेळी नेहमी प्रमाणेच सकाळी मंदिरात अभिषेक पूजा आरती करण्यात आली.
सायंकाळी ठिक ६:३० वाजता संत दासगणू यांचेसह ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधी सोहळा दीन निमित्त प्रतिमा पूजन, दिप प्रज्वलन करत पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
संत दासगणूंच्या श्री साई स्तवन मंजिरी व विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र चे सामूहिक वाचन झाले. संत ज्ञानेश्वर तसेच दासगणू यांचे जीवनावरील आठवणींना उजाळा देत कीर्तनास सुरुवात झाली, यावेळी बोलताना उल्हासबुवा वाळूंजकर यांनी साई चरणी असणारी सेवा प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणावी व हिच खरी साई भक्ती आहे याचे दाखले दिले. यावेळी या कार्यक्रमाला येथे २२ वर्षे ..पूर्ण होत आहेत.
दासगणू यांचे आजेगावकर घरातील केशव धर्माधिकारी गुरुजी यांनी दीप प्रज्वलन केले. वैभव गुरुजी आभार मानून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी पौरोहित्य स्वप्नील जोशी तर संदेश खोत, विनायक रत्नपारखी, देवकर गुरुजी यांनी परिश्रम घेतले.
सुभाष जाखडी, शशिकांत कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, विजय पैठणकर, महेश पाटील , पांडे गुरुजी, वाळुंजेकर, तुषार नागरे, बापू जाखडी, सौ. जाखडी, रोहिणी रत्नपारखी, हेमलता रत्नपारखी, सौ.वाळुंजकर, सौ.खोत. यासह अनेक साई भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
यावेळी तबला साथ आदित्य मराठे, तर हार्मोनियम विलास खडीझोड यांनी केली.