डी. डी. फापाळे यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार!

अकोले/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकशाळा मुख्याध्यापक संघ महामंडळा मार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार अबीतखिंड ता अकोले येथील सर्वोदय विद्या मंदिरचे मुख्याध्यापक डी. डी. फाफळे यांना नुकताच प्रदान करण्यात आला
अहमदनगर येथे सहकार सभागृहात झालेल्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र मुख्याध्यापक मंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, सचिव शांताराम पोखरकर, अधिवेशनाचे अध्यक्ष महेंद्र गणपुले, स्वागताध्यक्ष सुनील पंडित यांचेसह शिक्षक आमदार किशोर दराडे, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी राज्यातून विविध शाळांचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापक संघाचे राज्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळा, विद्यार्धी प्रिय असणारे मुख्याध्यापक श्री दशरथ फापाळे यांचे अकोले, कोतुळ, अबीतखिंड ,बेलापूर, ब्राम्हणवाडा , सातेवाडी या परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे




