
एस. के. जाधव (प्रतिनिधी )
कोकणवाडी दि. १३
अकोले तालुक्यातील कोकणवाडी आणि तिरडे या गावच्या हद्दीत, कौलीच्या जंगलातील शिवकालीन पुरातन श्री विघ्नहर्ता गणेश (देडयादेव ) मंदिराचा जिणोद्धार, होम हवन व पूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
अतिशय जुन्या काळात ही मुर्ती स्थापन करण्यात आली होती. आजूबाजूला घनदाट जंगल आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ह्या मूर्तीला बघताच वाटसरूंचे श्रद्धेने हात जोडले जायचे. जंगलातून प्रवास करताना स्मरण करून जंगल पार केला जायचा. नवसाला पावणारा देडयादेव ( श्री गणेश ) म्हणून पंचक्रोशीत ख्याती आहे.
गावकऱ्यांच्या सहभागातून झालेला हा आनंद उत्सव आणि सामाजिक गेट-टुगेदर असल्याची भावना व्यक्त केली. हा सोहळा एकात्मतेचे प्रतीक ठरला. श्रद्धा,परंपरा आणि संस्कृती जपत मंदिराच्या जीर्णोदराचे कार्य हे भाविकांसाठी नव संजीवनी ठरेल अशा भावना प्रमुख पाहुण्यांनी मनोगतातून व्यक्त केल्या.
मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदान आणि सहकार्याची तयारी दर्शवली. सामाजिक एकोपा आणि परंपरेची जपणूक हा या उपक्रमाचा हेतू आहे असे आयोजकांनी सांगितले.

सौ. सीमा व भगवान भाऊ जाधव या उभयतांनी हा पवित्र सोहळा पूजाविधि संपन्न केला. मंदिराच्या सुशोभीकरणासाठी विंड वर्ल्ड इंडिया लिमिटेड कंपनीचे कर्मचारी यांनी काम पाहिले. पवन ऊर्जा प्रकल्प ऑफिस कोकणवाडी येथून डी.जे. च्या तालात भव्य मिरवणूक मंदिरापर्यंत पोहोचली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजेंद्र बडगुजर (स्टेट हेड ) श्री निलेश गिडे,श्री खंडेराव महाले, श्री संदीप भोसले, श्री दिलीप मामा टिळे, श्री अरुण गायकवाड, श्री स्वप्नील कहार, तसेच विंड वर्ल्ड इंडिया लिमिटेड व रेनॉम पावर कंपनीचे अधिकारी व सर्व स्टाफ तसेच सत्यजित कंट्रक्शन आणि ज्ञानेश्वरी इंटरप्राईजेस कंपनीचे कर्मचारी श्री विठ्ठल रामदास जाधव, श्री युवराज जाधव, श्री शंकर जाधव, श्री विठ्ठल पंढरीनाथ जाधव, श्री रामा खोकले, श्री चिंधू खोकले. वन विभागाचे अधिकारी मॅडम सोनाली डगळे, श्री तुकाराम नाडेकर, श्री भोरू मेंगाळ, श्री संतू आगविले, श्री भाऊराव जाधव, श्री अर्जुन जाधव, श्री दीपक जाधव, श्री मंगा अगविले तसेच या कार्यक्रमासाठी डी.जे. आणि मंडपाचे सहकार्य करणारे श्री संपत भांगरे. ग्रामस्थ, तरुण मित्र मंडळ, पोलीस विभाग उपस्थित होते.
शेवटी एम्प्लाय कंपनीचे अधिकारी श्री अरुण गायकवाड यांनी महाप्रसाद दिला.
