धार्मिक

मोग्रस (ता अकोले )येथील सयाजी निवृत्ती गोडसे यांची निवड

कोतुळ दि 31

अकोले तालुक्यातील मोग्रस गावचे धार्मिक व अध्यात्मिक व्यक्तिमत्व सयाजी निवृत्ती गोडसे यांची आळंदी येथील आगस्ती आश्रम धर्मशाळा च्या विश्वस्त मंडळामध्ये कार्यकारी विश्वस्त पदी निवड झाली आहे

संगमनेर अकोले तालुक्यातील श्री अगस्ती ऋषी पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र कोतुळेश्वर पायी दिंडी ,श्री रामेश्वर देवस्थान पायी दिंडी सोहळा यांचा आळंदी येथे आगस्ती ऋषीं आश्रम धर्मशाळा आहे या धर्मशाळा आश्रम च्या कार्यकारी विश्वस्त पदी मोग्रस गावचे सुपुत्र एक बहुआयामी व्यक्तिमत्व ह भ प सयाजी निवृत्ती गोडसे यांची विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल अकोले संगमनेर तालुक्यात अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
मुळमाता दूध संस्थेचे व्हा. चेअरमन संतोष भाऊ गायकर, श्री. गोरख गायकर, श्री. नामदेव गायकर व्यापारी, श्री. अंकुश भोसले, सामाजिक युवा कार्यकर्ते मंगेश भाऊ गायकर, मुळमाता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त श्री. रुपेश गायकर, युवा फोटो ग्राफर साई गायकर यांनी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button