इतर

श्री.ताराचंद पांडुरंग नवले यांना कृषीथॉन २०२५ चा ‘प्रयोगशील शेतकरी पुरस्कार’ जाहीर.

एस. के. जाधव / प्रतिनिधी
कोकणवाडी (ता अकोले) दि.४ श्री.ताराचंद पांडुरंग नवले यांना कृषीथॉन २०२५ चा ‘प्रयोगशील शेतकरी पुरस्कार’ जाहीर.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी गावचे प्रगतिशील शेतकरी ताराचंद पांडुरंग नवले यांना प्रतिष्ठेचा ‘कृषीथॉन २०२५’ मधील ‘प्रयोगशील शेतकरी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. युवकांचा शेतीतील सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने ‘ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन’ व ‘मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि.’ यांच्या संयुक्त विद्यमाने सन १९९८ पासून ‘कृषीथॉन’ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कृषी प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते.
यंदा या प्रदर्शनाच्या १८व्या आवृत्तीचे आयोजन नाशिक येथील ठक्कर्स डोम येथे १३ ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान करण्यात आले असून, १४ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील निवड झालेल्या शेतकऱ्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी इंदोरी येथील श्री.ताराचंद पांडुरंग नवले यांची निवड झाली आहे. त्यांच्या प्रयोगशील शेतीतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली असून, त्यांच्या कार्यातून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे. नवले यांनी अद्रक, फुलशेती आणि ऊस पिकांमध्ये विशेष यश संपादन केले आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीत पशुधन व दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तसेच समाजातील विविध स्तरांतून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. हा सन्मान त्यांच्या समर्पित, प्रयोगशील व आदर्शवत कृषी कार्याची दखल असल्याचे कृषी जाणकारांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button