मजुरी व वेळेची बचती च्या उद्देशाने आदीवासी भागात शेतकऱ्यांना दिले सायकल कोळपे

ए.एस.के. फाऊंडेशन, आणि बायफ चा पुढाकार
एस. के. जाधव
कोकणवाडी प्रतिनिधी–
ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई पुरस्कृत आणि बायफ (BISLD) नाशिक संचलित समृद्ध किसान प्रकल्प अंतर्गत गुहिरे, भंडारदरा, रनद बुद्रुक, रनद खुर्द, कोलटेंबे, वाकी या ठिकाणी प्रकल्पामार्फत रब्बी हंगामात भाजीपाला लागवड करण्यात येणार आहे. तसेच मिरची, वांगी, वाल, टोमॅटो, भेंडी, बटाटा, लागवड शेतकरी करत असतात, परंतु अंतर मशागती ची कामे करत असताना शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत तसेच तणकाढणी साठी महिलाना खुप कष्ट करावे लागतात. त्यांचे कष्ट कमी व्हावे, मजुरी वाचेल, तसेच वेळेची बचत होणार आहे या उद्देशाने प्रकल्पाच्या माध्यमातून व ग्राम विकास समिती मार्फत 6 गावांमध्ये प्रत्येकी 5 महिला व शेतकरी यांना असे एकूण 30 सायकल कोळपे देण्यात आले.

सायकल कोळप्या मुळे पूर्ण शेतीची खुरपणी, भर देणे, जमीन मशागती साठी याचा वापर करण्यात येणार आहे.
या उपक्रमा चे नियोजन ए.एस.के. फाऊंडेशनचे श्री. सिद्धार्थ अय्यर व श्री. अरुण बांबळे आणि बायफचे श्री. प्रदीप खोसे, श्री सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बायफ चे राम कोतवाल, विष्णु चोखंडे, निलेश आलवने , काजल देशमुख, मारुती सगभोर यांनी केले.



