इतर

कठोरपणा आणि मायेचा तोल राखण ही शिक्षकाची कला असते.- आ.डॉ.किरण लहामटे

अकोले/प्रतिनिधी 

=कठोरपणा आणि मायेचा तोल राखण ही शिक्षकाची खरी कला असते.शिक्षक केवळ अभ्यासक्रम पुर्ण करत नाही तर विचारांची दिशा ठरवतो.आज दुर्लक्षीत वाटणारा विद्यार्थी उदया उभा राहिला की शिक्षकाचा विजय होतो. शिक्षक म्हणजे केवळ शिकवण देणारा नव्हे,तर माणूस घडवणारा प्रवास आहे.असे प्रतिपादन तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ.किरण लहामटे यांनी केले.

पिंपळगाव नाकविंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आढळवाडी येथे वाळू राघू पथवे  हे आपल्या प्रदिर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.त्यांच्या सेवापुर्ती गौरव सोहळा निमित्त आमदार किरण लहामटे  बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच लक्ष्मण सोंगाळ हे होते.या प्रसंगी अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारूती मेंगाळ,अहिल्यानगर भाजपाचे उपाध्यक्ष यशवंत आभाळे,अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र डावरे,सरपंच लक्ष्मण सोंगाळ, उपसरपंच मारूती काळे,पोलीस पाटील चंद्रकांत लगड,निब्रळ ग्रामपंचायत सरपंच उल्हास पथवे, विजय डावरे,भाऊसाहेब कासार,प्राचार्य सुनिल धुमाळ,महाराष्ट्र राज्य प्राथ.शिक्षक संघाचे राज्य नेते बापुसाहेब तांबे,जगदीश रणवीर,आप्पासाहेब आभाळे,कैलास सारोक्ते,बाळासाहेब आरोटे,जयसिंग कानवडे,भास्कर कानवडे,अण्णासाहेब ढगे,रविंद्र रूपवते,सुभाष बगनर,काळू धनगर,मारुती आभाळे,वाळिबा लगड,पंढरिनाथ पोपेरे,गणेश बगनर,भाऊपाटील बगनर,चिमण मेंगाळ यांसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

आमदार डॉ.किरण लहामटे यांनी पुढे मार्गदर्शन करताना शिवबा जन्माला यायचा असेल तर महिलांना आधी जिजाऊ व्हायला लागेल.जीवनात कष्ट,संस्कार तसेच वेळेला महत्त्व दया,निर्वेसनी रहा,मोबाईल पासून दुर रहा.जीवन एकदाच आहे आनंद घ्या असे विचार व्यक्त केले.

यशवंत आभाळे यांनी चांगले काम करणारा माणूस कधीच सन्मान मागत नाही. त्याचे कार्यच त्याला सन्मानास पात्र बनवते.त्यामुळे ज्या ठिकाणी नेमणूक त्या ठिकाणी प्रामाणीक काम करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.

बापुसाहेब तांबे यांनी वाळू पथवे सरांची सेवानिवृत्ती नसून जीवनाची नवीन आवृत्ती सुरू झाली आहे.गावाला शाळेचे कौतूक,तर शाळेला गावचा आधार असेल तर नक्कीच प्रगती होते.असे विचार व्यक्त केले.

यावेळी मारूती मेंगाळ,मारूती काळे,भाऊसाहेब कासार आदी मान्यवरांनी वाळू पथवे सरांना आपल्या मनोगतातून  शुभेच्छा दिल्या.

आढळवाडी ग्रामस्थांनी पथवे सरांची बैलगाडीतून शानदार मिरवणूक काढली. तर चिमूकल्या विद्यार्थ्यांनी लेझीमवर नृत्य करत ठेका धरला.

वाळू पथवे सरांचा ग्रामस्थांनी सहपत्नीक सत्कार केला.यावेळी पथवे सरांनी उच्च दर्जाची साऊंड सिस्टम शाळेला भेट दिली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तावीक मुख्याध्यापक पोपट चौधरी यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.सचिन लगड यांनी केले. तर भाऊपाटील बगनर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button