अकोले तालुक्यात माजी सैनिक रमेश खरमाळे यांचे पर्यावरण संवर्धनावर मार्गदर्शन

अकोले प्रतिनिधी
: जुन्नर येथील माजी सैनिक श्री. रमेश गणपत खरमाळे यांनी भारतीय सैन्य दलात १७ वर्षे देशसेवा बजावून सन २०१२ मध्ये सन्मानपूर्वक निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीनंतर त्यांनी पर्यावरण संवर्धन, सामाजिक कार्य, शिक्षण, इतिहास संवर्धन व युवक प्रेरणा या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे.
अकोले तालुक्यातील विविध शाळांमध्ये त्यांनी “पर्यावरण संवर्धन” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा उपक्रम वनविभाग राजूरचे डी. डी. पडवळे, अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माने साहेब, गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, सरपंच यमाजी भांगरे, १००८ महामंडलेश्वर कोंडार महाराज तसेच पर्यावरण प्रेमी ग्रुप चे अध्यक्ष- राहुल प्रभाकर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या अंतर्गत सह्याद्री व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल व गुरुवर्य रा. वी. पाटणकर सर्वोदय विद्यामंदिर (राजूर), समर्थ माध्यमिक विद्यालय, पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र -मवेशी , शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मवेशी, शासकीय माध्यमिक व इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, जिल्हा परिषद शाळा पुरुषवाडी, शासकीय आदर्श आश्रम शाळा भंडारदरा कॅम्प तसेच एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, मवेशी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मवेशी येथे कार्यक्रम पार पडले.

मार्गदर्शनात खरमाळे यांनी निसर्ग व मानव यांचा अतूट सहसंबंध सोप्या व मनोरंजक पद्धतीने स्पष्ट करत पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. हवेतील कार्बनचे वाढते प्रमाण व त्यामुळे जीवसृष्टीला निर्माण होणारा धोका याबाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. धार्मिक व सामाजिक परंपरांना नैसर्गिक कारणांची जोड देत पर्यावरणाबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमासाठी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच पर्यावरण प्रेमी ग्रुपचे श्री. दत्ता लांघी, रमेश लेंभे, भरत बांबळे (मेजर), बांगर सर, दत्ता कोंडार, सुनील बांडे यांचे सहकार्य उल्लेखनीय ठरले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

या उपक्रमासाठी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच पर्यावरण प्रेमी ग्रुपचे श्री. दत्ता लांघी, रमेश लेंभे, भरत बांबळे (मेजर), बांगर सर, दत्ता कोंडार, सुनील बांडे यांचे सहकार्य उल्लेखनीय ठरले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.



