अहिल्यानगर जिल्हा बाल वैज्ञानिक प्रदर्शनात शासकीय आश्रमशाळांचे यश..!

*
अकोले प्रतिनिधी
-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजुर अंतर्गत प्रकल्पातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी जामखेड जि.अहिल्यानगर येथे दि 8 व 9 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या अहिल्यानगर जिल्हा बाल वैज्ञानिक प्रदर्शन 2026 मध्ये नेत्रदीपक कामगिरी केली

असून जिल्हास्तरीय विज्ञान, गणित प्रदर्शनात शासकीय आश्रमशाळा पळसुंदे येथील कु. सायली शिवराम गभाले हिच्या *”Bioplastic निर्मिती”* या प्रकल्पास 9 वी ते 12 वी गटात अहिल्यानगर जिल्हात प्रथम क्रमांक आला आहे. तर शासकीय आश्रमशाळा कोहणे येथील कु. प्रणिता विठ्ठल दिघे या विद्यार्थिनीची 9 वी ते 12 वी (गणित) गटात प्रथम क्रमांक येऊन या दोनही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. तर शिक्षक गटात शासकीय आश्रम शाळा केळी रुम्हणवाडी येथील विज्ञान शिक्षक श्री. मंगेश वाघ सर यांना विज्ञान विभागातील प्रदर्शनीय साहित्यास द्वितीय क्रमांक मिळाला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना आज दि.9 रोजी राज्याचे जलसंधारण मंत्री श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय बक्षिस प्रदान करण्यात आले.सदर प्रसंगी विज्ञान गणित शिक्षक संघटणेचे पदाधीकारी उपस्थित होते.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी बाल वैज्ञानिक प्रदर्शनात मिळवलेल्या यशाबद्दल राजुर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीम. देवकन्या बोकडे,सहा.प्रकल्प अधिकारी मनोजकुमार पैठणकर,दिपक कालेकर आंबादास बागुल, तुषार पवार यांच्यासह पळसुंदे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री.डाॅ.पंडीत कदम, कोहणे शाळेचे मुख्याध्यापक श्री.चंदन बडवे,केळीरूम्हणवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री.शिवाजी नरके यांनी अभिनंदन केले असुन यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध थरातून कौतुक होत आहे.



