अकोले -कोतुळ मार्गवर धामणगाव पाट शिवारात बेकायदा देशी दारू पकडली!

छापा कारवाईत 5 लाखाचा मुद्देमाल जप्त
अकोले प्रतिनिधी
कोतुळ (ता अकोले) येथे अवैध मार्गाने विक्रीसाठी जाणारी बेकायदा देशी दारूची वाहतूक करणारे वाहन व आरोपीना पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले
अकोले- कोतुळ मार्गावरील धामणगाव पाट शिवारात ही घटना घडली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अकोले व श्रीरामपूर येथील पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकत दिनाक 10/04/2026 रोजी सकाळी 08.30 वा. चे सुमारास धामणगाव पाट येथे हि कारवाई केली. सुमारे 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

दिनांक 10/04/2026 रोजी पो कॉ अशोक शशिकांत गाढे तसेच पो.हे.कॉ दादासाहेब शंकर लोडे, पो.हे.को. संदिप संजय दरंदले, पो. कॉ राजेद्र भाऊसाहेब बिरदवडे सर्व ने, अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपुर यानी अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे श्रीरामपुर यांचे आदेशाने अकोले पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पो.हे.को/दादासाहेब लोढे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, अकोले ते धामणगाव पाट रोडने कोतुळ बाजूकडे छोटा हत्ती गाडी क्र.एम. एच.17 सी.व्ही.4162या गाडीतून अवैध दारुची विक्री करण्यासाठी वाहतुक होणार आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने कोतुळ दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन सर्व पोलीस धामणगाव पाट गावचे शिवारात अकोले ते धामणगाव पाट जाणारे रोडवर पाझर तलावाकडे जाणारे रोडलगत डांबरी रोडवरील सी डी वर्कपुलाजवळ जावून पोलीस थांबले . त्यानंतर सकाळी 08.30 वा.चे सुमारास अकोले बाजूकडून एक पांढरे रंगाची छोटा हत्ती गाडी क्र. एम. एच. 17 सी. व्ही.4162 ही धामणगाव पाट गावचे दिशेने येताना दिसली. हि गाडी थांबवून सदर गाडी चालकास गाडीमध्ये काय आहे याबाबत विचारणा केली असता
त्यांची नावे 1 ) विशाल पोपट निळे वय 26 वर्षे रा. कौठे धांदरफळ ता. संगमनेर व त्याचे शेजारी बसलेल्या ईसमाने त्याचे नाव 2)राजेद्र बाळासाहेब तांबे वय 30 वर्षे रा. पेमगिरी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर असे सांगून त्यांचे ताब्यातील गाडीमध्ये देशी बॉबी संत्रा दारूचे बॉक्स असल्याचे सांगितले. त्यांनी दारू वाहतूकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.
त्यावेळी त्यांना सदरचा माल कोणाचा असून कोठे घेवून चालला आहे याबाबत विचारपूस करता विशाल पोपट निळे याने सांगितले की, सदरचा माल हा अक्षय मारूती वाकचौरे रा.परखतपूर ता.संगमनेर याचे सांगणे नुसार संगमनेर येथील अकोले नाका जवळील उमेश सूर्यवंशी रा. संगमनेर यांचे देशी दारूचे दुकानातून आणला असून तो कोतुळ येथील
गि-हाईकांना देणेसाठी घेवून चाललो आहे असे सांगितले
1)1,19,040- रूपये किं. च्या देशी दारू बॉबी संत्रा कं. दारूचे एकूण एकुण 31 सिंलबद बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये एकूण 48सीलबंद बाटल्या प्रत्येकी 180 मिली च्या अशा एकूण 1488 सीलबंद बॉटल असा प्रत्येकी 80 रूपये विक्री दराप्रमाणे असलेला व त्यांचा बॅच नं. RV B NO.13 एप्रिल 2026 असलेला
2)40,000/- रूपये किं.च्या देशी दारू बॉबी संत्रा कं. दारूचे एकूण 08 सिंलबद बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये एकूण 100 सीलबंद बाटल्या प्रत्येकी 90 मिली च्या अशा एकूण 800 सीलबंद बॉटल प्रत्येकी 50 रूपये विक्री दराप्रमाणे असलेला व त्यांचा बॅच नं. RVB B NO 15 एप्रिल 2026 असा असलेला
3) 5,000/- रूपये किं.चा रेडमी कं.चा अॅड्रॉईड मोबाईल इसम नामे विशाल पोपट निळे अंगझडती मध्ये मिळून आलेला
4)500/- किं.चा एक काळे रंगाचा जीओ कं.चा मोबाईल त्याचा (इसम नामे राजेंद्र बाळासाहेब तांबे झडती मध्ये मिळून आलेला) याचे
5)3,00,000 /- रूपये किं.ची एक पांढरे रंगाची मारूती सुझुकी कं. ची सुपर कॅरी मालवाहतूक गाडी क्र. एम. एच. 17सी. व्ही. 4162 असा असलेली जु.वा. किं.अं.4,64,540/-रू. येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा देशी दारूचा मुद्देमाल, मोबाईल व मालवाहतूक गाडी क्र.एम.एच.17 सी. व्ही. 4162 इसम नामे 1) विशाल पोपट निळे वय 26 वर्षे रा. कौठे धांदरफळ ता. संगमनेर व 2)राजेद्र बाळासाहेब तांबे वय-30 वर्षे रा. पेमगिरी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांच्या कब्जात मिळून आल्याने पो.हे.कॉ. अनिल जाधव यांनी सोबतचे पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करून सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला
जप्त मुद्देमाल मालवाहतूक गाडी व आरोपींना ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणले आहे.
आरोपी नामे 1) विशाल पोपट निळे वय 26 वर्षे रा. कौठे धांदरफळ ता. संगमनेर व 2)राजेद्र बाळासाहेब तांबे वय 30 वर्षे रा. पेमगिरी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांनी आरोपी नं. 3) अक्षय मारूती वाकचौरे रा. परखतपुर ता. अकोले आरोपी नं. 4) उमेश सूर्यवंशी (पूर्ण नाव,पत्ता माहित नाही) याचेशी संगणमत करून त्यांचे ताब्यातील सुपर कॅरी मालवाहतूक गाडी क्र.एम.एच.17 सी. व्ही. 4162 हीचे वरून वरील वर्णनाचा व किंमतीचा देशी दारूचा माल आर्थीक
फायदयासाठी विनापरवाना, बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना मिळून आले आहे. म्हणून आरोपी नामे 1) विशाल पोपट निळे वय 26 वर्षे रा. कौठे धांदरफळ ता. संगमनेर व 2)राजेद्र बाळासाहेब तांबे वय 30 वर्षे रा. पेमगिरी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांनी आरोपी नं. 3) अक्षय मारूती वाकचौरे रा. परखतपुर ता. अकोले (फरार) व आरोपी नं. 4) उमेश सूर्यवंशी (पूर्ण नाव, पत्ता माहित ) यांचे विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ), (ई), 83 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे
.



