कोंकण

पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत रस्ता सुरक्षतेची विशेष तपासणी मोहिम

पनवेल|प्रतिनिधी|

श्रीनाथ दत्तात्रेय लाड|दि.20|:-

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्यामार्फत रस्ते सुरक्षेसाठी तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी सातत्याने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून सर्व सुजान नागरिकांनी रस्त्यावरील होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व रस्ता सुरक्षिततेसाठी वाहतुक नियमांचे पालन करावे. तसेच वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, आवश्यक कागदपत्रे (विमा, परवाना, प्रदूषण प्रमाणपत्र इ.) अद्ययावत ठेवावीत व सुरक्षित वाहन चालन करावे, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल निलेश धोटे यांनी केले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल कार्यालयाने सन 2025-2026 व माहे एप्रिल 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत रस्ता सुरक्षतेच्या अनुषंगाने विना हेल्मेट, अवैध विमा (Invalid Insurance), वाहन चालविताना मोबाईलचा वापर, वैद्य पीयुसी प्रमाणपत्रे नसलेली वाहने, अवैध प्रवासी वाहतूक, विना नंबरप्लेट रस्त्यावर चालणारी वाहने, ऑटो रिक्षा नियमभंग, ओडिसी वाहतूक करणारी वाहने, वैद्य परवाना नसलेली वाहने,अशा प्रकारच्या विविध गुन्हयांसाठी या कार्यालयातर्फे निरंतर विशेष मोहिमा राबविण्यात येतात.

गौण खनिज व ओव्हरलोड मालवाहतुक करणाऱ्या वाहनांवर विशेष तपासणी मोहिमा व कडक कारवाई करण्यात येत आहे.  या कारवाई अंतर्गत गेल्या दोन महिन्यात साधारणतः 235 वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली आहे.  एकूण तडजोड शुल्क रु.128.96 लाख इतका आकारण्यात आला आहे. या कारवाईत क्षमतेपेक्षाजास्त माल भरणे, नंबर प्लेट नसणे, मालावर अच्छादन नसलेली वाहने, रिफलेक्टर नसलेली वाहने व इतर प्रकारच्या दोषी वाहनांवर विशेष कारवाई करण्यात आली आहे.

या विशेष मोहिमांअंतर्गत सन 2025-2026 व माहे एप्रिल 2026 या कालावधीत नियमभंग करणाऱ्या दोषी वाहनांवर करण्यात आलेल्या कारवाईची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे

 : एकूण 26,539 दोषी वाहनांवर मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत विविध गुन्हयांकरिता नियमभंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान या कार्यालयाकडून एकूण रु. 105.19 लाख इतके तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.  हेल्मेट न वापरणे  11 हजार 243,  अवैध विमा (Invalid Insurance)  5 हजार 973,  ओव्हरलोड मालवाहतूक (Overload Goods Vehicle) – 2 हजार 349,  ताडपत्रीने आच्छादीत नसलेली वाहने (Tarpoline) – 304, विना नंबरप्लेट रस्त्यावर चालणारी वाहने  107,  वैद्य योग्यता प्रमाणपत्रे नसलेली वाहने 3 हजार 703,  वाहन चालविताना मोबाईलचा वापर  804,  वैद्य पीयुसी प्रमाणपत्रे नसलेली वाहने  6 हजार 705,  वैद्य परवाना नसलेली वाहने 2 हजार 816,  वेगमर्यादा ओलांडणे (Overspeed) – 6 हार 379,  ऑटो रिक्षा नियमभंग – 2 हजार 203,  अवैध प्रवासी वाहतूक 535, स्कूलबस नियमभंग 229, ओडिसी वाहतूक करणारी वाहने 219.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button