मुतखेल आश्रम शाळेची विविध परीक्षेत, उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम..!

अकोले-भंडारदरा धरण जलाशय व अतिदुर्गम अभयारण्य क्षेत्र परिसरातील येणाऱ्या व सदैव नैसर्गिक व भौतिक अडचणीचा सामना करणार्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळा रतनवाडी युनिट-मुतखेल येथील आश्रम शाळेने आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा प्रतिकूल परिस्थितीतही कायम राखत विविध परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.या शाळेने मार्च 2026 मध्ये झालेल्या एस.एस.सी .परीक्षेत प्रतिवर्षाप्रमाणे 100% निकालाची परंपरा कायम राखली असुन दहावीच्या परीक्षेत 6 विद्यार्थी विशेष श्रेणीत, 25 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 8 विद्यार्थी व्दितीय श्रेणीत तर 2 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत.
शाळेत प्रणय अशोक इदे-प्रथम,साक्षी संपत शिंदे-व्दितीय,प्रणाली राजाराम भांगरे -तृतीय आलेले आहेत. तसेच एप्रिल 2026 मध्ये झालेल्या इ.5 वी व 8 वी स्कॉलरशिप परीक्षेत पाचवीचे 2 तर आठवीचे 25 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. तसेच आदिवासी विकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या जेई व निट प्रवेश स्पर्धा परीक्षेत शाळेचे प्रणय अशोक इदे व परते राधाबाई बहिरू या विद्यार्थ्यांची निवड झाली असून संबधीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च आदिवासी विकास विभागामार्फत मोफत केला जाणार आहे.
शाळेने विविध परीक्षेत गुणवत्ता मिळाल्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे गावच्या सरपंच श्रीम.दिपालीताई रोंगटे,उपसरपंच श्री.कैलास इदे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.महादु मोहरे,उपाध्यक्ष श्री.विजय इदे तसेच सर्व सदस्य,मुख्याध्यापक श्री.आदिनाथ सुतार , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले आहे.



