इतरराजकारण

मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ पठार भागाला पाणी देतील – शेख

पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्यांनी ऊस लावण्याचा सल्ला देऊ नये

संगमनेर ( प्रतिनिधी) –

चाळीस वर्षापासून सर्व सतास्थान ताब्यात असतानाही साकूर पठार भागातील जनेतला पिण्याचे पाणी देवू न शकलेल्यांनी या भागात येवून बिन पाण्याचा ऊस लावण्याचा सल्ला देण्याचे धंदे करू नयेत अशी टीका भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचेवर केलीआहे

साकूर येथील मेळ्व्यात मेळाव्यात पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पा.यांच्यावर केलेल्या टिकेचा समाचार घेताना करणारी रौफ शेख म्हणाले की,साकुर पठार भागाला पाणी उपलब्ध असते तर ऊस विकास मेळावे घेण्याची वेळ तुमच्यावर आली नसती.मुळा नदीवर जे काही बंधारे झाले ते सर्व बंधारे माजी मंत्री स्व.मधुकर पिचड यांच्या कार्यकाळात झाले आहेत त्यामध्ये तुमचे योगदान काहीच नाही. माझे वडील स्व.सिराजभाई शेख हे पिचड यांचे खंदे समर्थक म्हणुन या भागात कार्यरत होते.2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचना होऊन या भागाचा समावेश संगमनेर विधानसभा मतदारसंघात झाल्यानंतर आपल्या काळात एकही नवीन बंधारा मागील सतरा वर्षांच्या काळात मुळा नदीवर बांधला गेला नाही हे आपले अपयश लपून राहीलेले नाही.त्यामुळे मुळा नदीवरील बंधार्‍यांचे खोटे श्रेय आपण घेऊ नये.तसेच पिंपळगाव खांड धरणाचा प्रकल्प होत असताना आपण स्वत: राज्य मंत्रिमंडळात असताना आपल्याला या पठार भागाचा समावेश लाभक्षेत्रात करता आला नाही हे आपले कर्तृत्व पठार भागातील जनतेन केव्हाच ओखळले होते.

पाणी नसल्यामुळे या भागातील शेतकर्‍यांच्या दोन-तीन पिढ्या बरबाद झाल्या आहेत.मात्र यापुढे आता असे होणार नाही. राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री .राधाकृष्ण विखे पा.आणि आमदार अमोल खताळ पा.यांच्या माध्यमातुन उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून या साकुर पठार भागाचा पाणी प्रश्न आम्ही सोडवणारच असून नूसती आश्वासन नाहीतर सर्व्हेक्षणाची प्रक्रीया पूर्ण झाली असल्याचे रऊफ शेख यांनी ठामपणे सांगितले.


साकुर पठारभागातील रद्द झालेले रस्ते आमदार अमोल खताळ पा. यांनी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या माध्यमातुन पुन्हा मंजुर करून आणले आहेत पठार भागात मोठ्या प्रमाणावरती विकासकामे सुरु केली आहेत ,त्यामुळे या रस्त्यांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आपण करु नये. अशी टीका रौफ शेख यांनी केली.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागात आता औद्योगिक वसाहत होणार असल्यामुळे या भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे परंतु गेली 40 वर्षे तुम्हाला या भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी देता आल्या नाहीत. आता तुम्ही त्यांना काय रोजगार मिळवून देणार असा प्रश्न शेख यांनी केल
आपल्याच एका पदाधिकार्‍याने मागे एकदा माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये आपल्या स्विय सहाय्यकांच्या केबिनमध्ये कोण कोण ठेकेदार बसलेले असतात व कशा पद्धतीने कामकाज चालते याची माहिती दिली होती त्यामुळे तुमची टक्केवारी बंद झाली असल्यामुळे तुमची व तुमच्या बगलबच्च्यांची दुकानदारी बंद झाली त्यामुळे गैरव्यवहाराचे प्रकरण लवकरच पुढे येणार आहे त्यामुळे आता वैफल्यातून आमदार अमोल खताळ यांच्यावर टीका करत आहे परंतु जनतेला सर्व माहित आहे अजूनही बरंच काही बाकी आहे परंतु त्याला योग्य वेळी आम्ही निश्चितच उत्तर देऊ असेही रोफ शेख यांनी यावेळी ठणकावून सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button