वैशाली पन्हाळे यांचा कॉन्स्टेबल ते पीएसआय एक प्रेरणादायी प्रवास.

अकोले प्रतिनिधी –
“वेळेची किंमत कोणाला विचारावी? ज्याचं यश अवघ्या एका सेकंदाने हुकलंय त्याला! संगमनेरच्या शिवाजीनगर भागात राहणाऱ्या वैशाली हरिदास पन्हाळे यांच्या बाबतीत नेमकं हेच घडलं होतं. पण त्या एका सेकंदाने त्यांना हरवलं नाही, तर अधिक बलवान बनवलं.”
“सन २०१२ मध्ये अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात त्या कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्या. नोकरीची खडतर जबाबदारी आणि संसाराचा गाडा ओढत त्यांनी जिद्दीने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पोलीस खात्यात १४ वर्षं प्रामाणिक सेवा बजावल्यानंतर, २०२१ मध्ये त्यांनी खात्यांतर्गत पीएसआय पदाची परीक्षा दिली. मात्र, शारीरिक चाचणीत अवघ्या ‘मायक्रो तीन सेकंदांमुळे’ त्यांचे ४ मार्क कापले गेले आणि त्या मेरिटमधून बाहेर पडल्या. पीएसआय बनण्याचं स्वप्न डोळ्यासमोरून जाताना पाहून कोणीही खचलं असतं, पण वैशाली मॅडम वेगळ्या मातीतल्या होत्या.”

“त्यांना त्या दिवशी आयुष्यात ‘मायक्रो सेकंदाची’ खरी किंमत कळाली. घर, कुटुंब आणि पोलीस दलातील कर्तव्य सांभाळून अभ्यासाचा ताळमेळ घालणं सोपं नव्हतं. पण, ‘यावेळी कोणत्याही परिस्थितीत यशस्वी व्हायचंच’ ही जिद्द त्यांना शांत बसू देत नव्हती. अपयशाच्या दुसऱ्याच दिवसापासून त्यांनी पुन्हा जोमाने सुरुवात केली. त्यांना साथ लाभली ती कुटुंबाच्या आशीर्वादाची आणि पोलीस खात्यातील वरिष्ठांच्या मोलाच्या मार्गदर्शनाची.
“विशेषतः मैदानी चाचणीतील तो ‘मायक्रो सेकंदाचा’ अडथळा दूर करण्यासाठी त्यांना बळ मिळालं ते ‘एस के फिटनेस क्लब’कडून. संचालक

“कॉन्स्टेबल ते थेट पोलीस उपनिरीक्षक… वैशाली पन्हाळे यांचा हा थक्क करणारा पण प्रेरणादायी प्रवास आज लाखो महिलांसाठी आणि पोलीस दलातील सहकाऱ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरला आहे.
“जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अशक्य ही शक्य करून दाखवणाऱ्या वैशाली पन्हाळे यांचं आज संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.”



