इतर

गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने रघुनाथ जगताप यांचा गौरव

संजय उकिरडे/ प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ जगताप यांचा अहिल्यानगर जिल्हा परिषद आणि अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अहिल्यानगर येथे झालेल्या विशेष समारंभात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचे हस्ते जगताप रघुनाथ यांचा गौरव करण्यात आला जगताप यांनी बहुजन शिक्षण संघात 34 वर्षे शैक्षणिक सेवा बजावली आहे. संन 1992 पासून महात्मा फुले विद्यालय घुलेवाडी येथून त्यांच्या सेवेला सुरुवात झाली. इंग्रजी विषयाचे अध्यापन करताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले. तसेच शासनाच्या विविध शैक्षणिक योजना व उपक्रम राबविले. विद्यालयासह तालुक्यातील अन्य शाळांमध्ये उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांनी योगदान दिले. सिद्धार्थ विद्यालयात मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विविध प्रकल्प आणि शैक्षणिक प्रयोग राबविले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर घालण्याचे काम त्यांनी केले.

त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेची आणि विविध योगदानाची दखल घेऊन त्यांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमास सौ संध्या गायकवाड मॅडम शिक्षणाधिकारी (माध्य) अहिल्यानगर, बुगे साहेब (योजना )जिल्हा परिषद अहिल्यानगर म्हस्के साहेब वेतन पथक, मिथुन डोंगरे सरचिटणीस, राजेंद्र सोनवणे जिल्हा कार्याध्यक्ष, सुनीलजी पंडित, जिल्हाध्यक्ष सुनील सुसरे मुख्याध्यापक , बाबासाहेब बोडखे अध्यक्ष माध्यमिक शिक्षक सोसायटी, अप्पासाहेब शिंदे अध्यक्ष माध्य. व उच्च माध्य. शिक्षक सोसायटी अहिल्यनगर, बाळासाहेब वाकचौरे खजिनदार,संजय उकिरडे ,लहारे सर अध्यक्ष संगमनेर तालुका मुख्याध्यापक संघ सौ संगीता मस्के (सचिव) भवाळ भारत प्रादेशिक परिवहन अधिकारी, सुरेशजी कोते,डॉ. बाबुराव उपाध्ये साहित्यिक,गुंड बाळासाहेब गटशिक्षण अधिकारी पं.स.संगमनेर,सौ सविता जगताप मुख्याध्यापक, व सर्व नातेवाईक मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी मा.आमदार संग्राम जगताप, महापौर धनंजय जाधव, डॉ. सुभाष जाधव आयुर्वेदाचार्या (फ़ॉरेस्टर) अहिल्यानगर, श्री बाबासाहेब बोरुडे,सिद्धार्थ विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.लोकनेते बाळासाहेब थोरात, जयश्रीताई थोरात,उत्कर्ष रुपवते होते जयहिंद चळवळीचे संस्थापक डॉ. सुधीरजी तांबे, बहुजन शिक्षण संघाचे विश्वस्त ऍड.संघराज रुपवते, बी. आर. कदम अध्यक्ष ब. शि. संघ,सर्व विश्वस्त सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य कर्मचारी आणि पालकांनी जगताप यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button