इतर

विद्यानिकेतनच्या मुलींचा क्रिकेट संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र”

“

श्रीरामपूर : अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित श्रीरामपूर तालुकास्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या विजयामुळे संघाची अहिल्यानगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यालयाचे क्रीडाशिक्षक श्री. अजय आव्हाड सर, जाधव सर यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी केलेल्या सातत्यपूर्ण सरावाचे हे फळ असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री. विनोद रोहमारे , संस्थेचे चेअरमन मा. प्राचार्य टी.ई.शेळके व्हाईस चेअरमन डॉ. प्रेरणा शिंदे व खजिनदार डॉ.श्री. राजीव शिंदे यांनी विजयी संघाचे कौतुक केले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेतील पुढील वाटचालीसाठी सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button