इतर

ओबीसी महाएल्गार मेळाव्यास लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे – ॲड. सुभाष राऊत

ना.छगनरावजी भुजबळ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या
महाएल्गार मेळाव्याची जय्यत तयारी


बीड / प्रतिनिधी
ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते ना. छगनराव भुजबळ यांच्या उपस्थितीत रविवार दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 : 00 वाजता बीड येथे ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून ओबीसी महाएल्गार मेळाव्यास ओबीसी समाज बांधव, भगिनींनी, युवक, युवती, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मेळाव्याचे आयोजक तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲड. सुभाष राऊत यांनी केले आहे.


रविवार दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 : 00 वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या प्रांगणात ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते तथा कॅबिनेट मंत्री ना. छगनराव भुजबळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महाएल्गार मेळावा होणार असून याप्रसंगी राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे साहेब, माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, धनगर समाजाचे नेते आमदार आ. गोपीचंद पडळकर,धनगर समाजाचे नेते मा.प्रकाश आण्णा शेंडगे. मुस्लिम समाजाचे नेते शब्बीर अन्सारी, ज्येष्ठ साहित्यिक तथा भटक्या विमुक्त समाजाचे नेते लक्ष्मणराव गायकवाड, वंजारी समाजाचे नेते सत्संग मुंडे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ओबीसी आरक्षण अखंडित राहावे, ओबीसींच्या लेकरांना आरक्षणाचा लाभ मिळावा, ओबीसी समाजातील लेकरांच्या भवितव्यासाठी आणि ओबीसी समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सदरील महाएल्गार मेळावा होणार असून ओबीसी समाज बांधव, भगिनींनी, युवक, युवती, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मेळाव्याचे आयोजक तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲड. सुभाष राऊत यांनी केले आहे.


रविवारी होत असलेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगणाच्या प्रांगणात 75 हजार स्क्वेअर फुटाचा भव्य डोम उभारण्यात आला असून पावसाचा अंदाज लक्षात घेता 50,000 खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. मेळाव्यास येणाऱ्या प्रत्येक बंधू-भगिनींसाठी नाष्ट्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बीड शहरामध्ये ठिकठिकाणी “एकच पर्व ओबीसी सर्व!”असे घोषवाक्य असलेले झेंडे लावण्यात आले असून ठीक ठिकाणी बॅनर्स आणि पोस्टर लावण्यात आले आहेत. ओबीसी महाएल्गार मेळाव्याची तयारी पूर्णत्वाकडे झाली असल्याचे ॲड. सुभाष राऊत यांनी यावेळी सांगितले…,.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button