विद्यार्थ्यांना आळया खाऊ घालणाऱ्या भोजन ठेकेदारांवर कारवाई करा.

प्रकल्प कार्यालय राजूर येथे धरणे आंदोलन.
अकोले प्रतिनिधी
आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासन व ठेकेदार विरोधात राजूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धरणे आंदोलन केले
आंदोलन केवळ आदिवासी मुलांच्या न्याय हक्कासाठी असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्ञानेश्वर लेंडे व त्यांचे सहकारी यांनी सांगितले .कुठपर्यंत आम्ही सहन करायचं आम्ही आमचा न्याय हक्क आमचे प्रश्न कोणाकडे मागायचे हे ह्या आंदोलनामध्ये आम्ही दाखवून देणार आहे असे सांगत
.सेंट्रल किचन मुंढेगाव येथून येणाऱ्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका कायमचा रद्द करून त्याचा काळ्या यादीत समावेश करावा.जेवण वेळेवर न पोहोचणे, दर्जाहीन आहार या समस्या समोर आल्या आहेत. या समस्या त्या त्या वेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. मात्र या समस्यांवर कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही.

मुंढेगाव येथून सुरु असलेलं भोजन गृह बंद करून पूर्वीची शासकीय मेस पध्दत सुरू करावी अशी मागणी केली आहे.तसेच मवेशी येथे तात्काळ सेंट्रल किचन सुरू करावे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्ञानेश्वर लेंडे यांनी सांगितले
योग्य ती कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील तसेच यापुढे बदल न केल्यास प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास पुढे राज्यभर तिव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे ज्ञानेश्वर लेंडे यांनी सांगितले आहे.
——–



