दिल्ली येथे जनजाती कर्मयोगी अभियान संपन्न.

एस. के. जाधव / प्रातिनिधी
कोकणवाडी ( अकोले ) दि १८.
जनजाती कर्मयोगी अभियान नवी दिल्ली विज्ञान भवन या ठिकाणी संपन्न झाले. या संमेलनासाठी जनजाती आयोगाचे देशातील सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. देशाच्या महामाही राष्ट्रपती द्रौपती मुर्मू या कार्यक्रमासाठी संबोधित करण्यासाठी उपस्थित होत्या.
यावेळी त्या म्हणाल्या, ” आदिवासींचे हक्क आणि अधिकार आदिवासींना मिळाले पाहिजे शैक्षणिक, सामाजिक, आणि आर्थिक, स्तर उंचावला पाहिजे. देशातील जंगल, जमीन आणि पाणी यावर अधिकार असलेला माणूस म्हणजे आदिवासी म्हणून कोणत्याही क्षेत्रात आदिवासी समाज वंचित राहता कामा नये” असे यावेळी राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी सांगितले. यामधून गाव पातळीवरती निश्चितपणे कर्मयोगी अभियानाच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते जोडले जातील आणि आदिवासींचा विकास होईल. ही अपेक्षा बाळगत
सदर प्रसंगी मा. उईके साहेब केंद्रीय जनजाती अयोग नवी दिल्ली, मा. पांडे साहेब केंद्रीय प्रधान सचिव, दिपू नायर जनजाती आयोग सचिव नवी दिल्ली, उराव मंत्री केंद्रीय जनजाचे आयोग, हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच देश भरातील तालुका, जिल्हा आणि गाव पातळीवरील सर्व राज्यातील कर्मयोगी या संमेलनासाठी उपस्थित होते.


