इतर

मुकुंद चिलवंत अहिल्या नगर चे नवे जिल्हा माहिती अधिकारी!

अहिल्यानगर प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार मुकुंद चिलवंत यांनी आज स्वीकारला यापूर्वी ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होते.

कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री. चिलवंत यांनी
कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत अधिक वेगाने,अचूकपणे व परिणामकारक पद्धतीने पोहोचविण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रसारमाध्यमांशी सुसंवाद राखत माहिती विभागाची विश्वासार्हता अधिक बळकट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले
यावेळी मावळते माहिती अधिकारी अमोल महाजन यांनी श्री. चिलवंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांचे स्वागत केले
या प्रसंगी लिपिक आयुष बाळदे, तुषार पाटील वाहन चालक प्रवीण मुठे आदी उपस्थित होते.

मुकुंद चिलवंत यांनी मंत्रालय, मुंबई येथील वृत्तचित्र शाखेत कार्यरत असताना त्यांनी शासनाच्या विविधविकासात्मक उपक्रमांचे प्रभावी दृकश्राव्य दस्तावेजीकरण, जनजागृतीपर माहितीपट निर्मिती तसेच जनसंपर्क विषयक विविध उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button