इतर

राजा हरिश्चंद्र विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

प्रतिनिधी / श्री एस. के. जाधव दि.१.


राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय ठोकळवाडी शेणीत व जि.प. प्राथमिक शाळा ठोकळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री एम. एम. लांघी साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
शालेय विद्यार्थ्यांची वकृत्व स्पर्धेनिमित भाषणे झाली. भाषणांमध्ये कु.कल्याणी लोहकरे आणि कु. वैष्णवी धोंगडे यांची भाषणे उत्कृष्ट ठरली.


यावेळी श्री घनशाम नवले यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले, ” देश पारतंत्र्यात होता तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून जहाल मतवादी गटाचे लोकमान्य टिळक यांनी स्वराज्याची चळवळ उभी केली. मवाळ गटाचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे होते. सत्य, असत्य, अहिंसा व सत्यागृहाच्या मार्गाने स्वातंत्र मिळवण्यासाठी सर्वात मोठे योगदान दिले.त्यांचा उद्देश एकच होता की जनजागृती करणे, देशाबद्दल प्रेम निर्माण करणे, भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत निर्माण करणे. ते अन्यायाविरोधी लढले. समाजसेवे बरोबर शाळा कॉलेज सुरु केले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाज प्रबोधन केले, पोवाडे, लोकगीते, अनेक कादंब-यांतून समाजाचे चित्रण केले.”
शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर म्हणाले, ” संस्थेचे अध्यक्ष श्री एम.एम. लांघी यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत हे विद्यालय सुरु केले. अनेक सामाजिक, धार्मिक कामे करताना समस्यांना तोंड द्यावे लागले. विद्यालयासाठी, गावासाठी, शिक्षणासाठी महान कार्य केले.”
श्री सुधाकर भांगरे यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे महत्त्व पटवून सांगीतले. लोकमान्य टिळक आणि शाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कार्य महान आहे. त्यांची फकिरा कादंबरी वाचा. या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अभ्यास करा.
संस्थेचे अध्यक्ष श्री एम. एम. लांघी यांनी त्यांचा शिक्षण प्रवास सांगीतला. ते म्हणाले,” गरीब कुटुंबात जन्मलो. इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण इथेच झाले. त्यानंतर त्र्यंबकेश्वरला गेलो. गरीबीची परिस्थिती असल्यामुळे दोन वर्ष घरीच थांबावे लागले. मुंबईला दुकानात काम केले. वडाळा महादेव येथे मॅट्रिक पास झालो. बीए बी एड केल्यानंतर शिक्षक झालो. शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी झालो. विद्यार्थ्यांनो तुम्ही सुद्धा अभ्यास करून पुढे जा.”


कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सुलभा लांघी यांनी विद्यार्थ्यांना जिद्द, चिकाटी, कष्टाचे महत्त्व पटवून दिले.
वडीलांच्या श्री एम. एम. लांघी वाढदिवसानिमित्त सौ. दमयंती बुळे यांनी आठरा हजार रुपये किमतीचे कपाट शाळेस भेट म्हणून दिले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री एम. एम. लांघी , कार्यक्रमाचे अध्यक्षा माजी गट शिक्षणाधिकारी सौ. सुलभा लांघी, संस्थेचे खजिनदार श्री मुरलीधर तळपे बाबा, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री किसन लांघी, श्री बाळू लोहकरे,जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधाकर भांगरे महादर्पनचे प्रतिनिधी श्री संतु जाधव , श्री विजय बढे , शिक्षकेत्तर कर्मचारी श्री नारायण धोंगडे, श्री अशोक लांघी, श्री पोपट भांगरे, ग्रामस्त व विदयार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब दातीर यांनी केले तर श्री तुकाराम बेणके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button