कोकणवाडी येथे भाज्या व कडधान्य प्रदर्शन संपन्न

प्रतिनिधी / श्री एस. के. जाधव
कोकणवाडी : दि. १६
अकोले तालुक्यातील विश्रामगडाच्या पायथ्याशीअसणाऱ्या कोकणवाडी येथे राष्ट्रीय पोषण माह २०२६ उत्साहात संपन्न झाला. अंगणवाडीतील बालकांना पौष्टीक आहार मिळावा, त्याच बरोबर महिलांना स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या पौष्टीक खादय पदार्थांची माहिती व्हावी यासाठी सदर उपक्रम राबविण्यात आला.
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण आहाराचे महत्त्व, आहारातील विविधता, आहारातील पुरेशा प्रमाणात प्रथिनांचा समावेश तसेच अंगणवाडी केंद्रात दिला जाणारा ताजा व गरम शिजवलेला आहार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर परिसरातील मिळणाऱ्या भाज्या व कडधान्य यांचे प्रदर्शन करण्यात आले. पालकांनी बालकांच्या विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी हे पालकाना समजून सांगण्यात आले. बालकांचे आरोग्य, वाढ व विकास यासाठी संतुलित व पौष्टीक आहार आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

या वेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण मेमाणे सर, सौ मनिषा देशमुख मॅडम, सरपंच सौ सुलोचना संतु जाधव,पर्यवेक्षिका श्रीमती इंदिरा सोनवणे, प्राथमिक आरोग्य पथकच्या सौ.अनिता बोराडे, सौ. सविता नारायण जाधव,सौ मिरा दिलीप बेंडकोळी, सौ. प्रियंका नामदेव जाधव, मदतनिस सौ मंगल किसन बेंडकोळी, सौ चंद्रभागा बाळू जाधव, सौ जिजाबाई खंडू जाधव, सौ मंदाबाई देवराम जाधव, सौ अंजना बोटे, सौ रंजना भारमल, सौ वनिता युवराज जाधव, सौ द्रोपदा भगवान जाधव आदी महिला उपस्थित होत्या. श्री लक्ष्मण मेमाणे सरांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषविले. अंगणवाडी सेविका सौ मिना तळपाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



