इतर

१७ सप्टेंबर “राष्ट्रीय श्रमिक दिन” म्हणून घोषित करावा भारतीय मजदूर संघाची मागणी

पुणे, दि. १७ सप्टेंबर २०२६ :


भगवान विश्वकर्मा जयंतीचा दिवस असलेला १७ सप्टेंबर हा दिवस “राष्ट्रीय श्रमिक दिन” म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील विविध तहसीलदार कार्यालयांमार्फत मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले.

तसेच, पुणे येथील विश्वकर्मा भवन, भारतीय मजदूर संघ कार्यालयात भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वंचित, शोषित व कंत्राटी कामगारांसह सर्व श्रमिकांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील विविध उद्योगातील सरकारी , निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम, खाजगी ओद्यौगीक आस्थापनेत उत्साहात संपन्न करण्यात आला .

भारतीय मजदूर संघाच्या वतीने दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी भगवान विश्वकर्मा जयंती श्रमिक दिन म्हणून साजरी करण्यात येते. भगवान विश्वकर्मा हे निर्मिती, कौशल्य, तंत्रज्ञान, उद्योग आणि श्रमाचे प्रतीक मानले जातात. देशाच्या आर्थिक, औद्योगिक आणि पायाभूत विकासामध्ये कामगार, कारागीर, तंत्रज्ञ, अभियंते तसेच विविध क्षेत्रांतील श्रमिकांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

देशाच्या विकास प्रक्रियेत श्रमिकांच्या श्रम व कौशल्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा, श्रमप्रतिष्ठेची भावना अधिक दृढ व्हावी आणि भावी पिढ्यांमध्ये कौशल्य व श्रमाबद्दल सन्मानाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने १७ सप्टेंबर हा दिवस “राष्ट्रीय श्रमिक दिन” म्हणून घोषित करावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केंद्र सरकारकडे केली आहे.

या मागणीचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील विविध तहसीलदार कार्यालयांमार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहे. “राष्ट्रहित, उद्योगहित व कामगारहित” या त्रिसूत्रीच्या माध्यमातून भारतीय मजदूर संघ कामगारांच्या हक्क, सामाजिक सुरक्षा व कल्याणासाठी सातत्याने कार्यरत आहे.

यावेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सचिव सागर पवार, भारतीय मजदूर संघ संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, मीडिया प्रभारी निलेश खेडकर, रविंद्र देशपांडे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज भदारके, उमेश विश्वाद, श्रीमती बेबीराणी डे , राम सरवसे , यश निंबाळकर , यांच्यासह विविध संलग्न कामगार संघटनांचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button