इतर

अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी सोनाली नाईकवाडी विजयी!

 वैष्णवी धुमाळ यांचे बाजूने 6 तर नाईकवाडी यांना 11 मते 

अकोले प्रतिनिधी 

 भाजपाच्या ताब्यात असणाऱ्या अकोले नगरपंचायत मध्ये भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे आज नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली  या निवडणुकीत सोनाली नाईकवाडी या विजयी झाल्या तर वैष्णवी धुमाळ यांचा पराभव झाला   भाजपातील बंडखोर गटाने बाजी मारल्याने माजी आमदार वैभव पिचड यांना राजकीय धक्का दिला आहे 

 अकोले नगरपंचायत चे  नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्यावरील  अविश्वास ठराव मंजूर झाल्याने रिक्त असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी   पिठासीन अधिकारी तथा प्रांत अधिकारी  अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली 

 अकोले नगरपंचायत  चे नगराध्यक्ष पदासाठी  निवडणूक पार पडली या निवडणुकीत  सोनाली नाईकवाडी  यांचा वाडींचा अकरा मतांनी विजय झाला

 निवडणुकीत भाजपच्या दोन गटांमध्ये थेट लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत सोनाली चेतन नाईकवाडी यांनी अकरा विरुद्ध सहा मतांनी वैष्णवी सोमेश्वर धुमाळ यांचा पराभव केला  निवडणुकीमध्ये 17 नगरसेवकांनी सहभाग घेतला आवाजी मतदानानंतर सोनाली नाईकवाडी यांच्या बाजूने 11 नगरसेवकांनी कौल दिला तर वैष्णवी धुमाळी यांना केवळ सहा मत मिळाली त्यानंतर पिठाची अधिकारी अरुण मुंडे यांनी सोनाली नाईकवाडी यांना अधिकृतपणे विजयी घोषित केला. 

या निवडणुकीतील विशेष बाब म्हणजे भाजपमध्येच दोन गट आमने सामने उभे ठाकले माजी आमदार वैभव  पिचड यांच्या नेतृत्वाखालील गटाने वैष्णवी धुमाळ यांना उमेदवारी दिली होती मात्र भाजपच्या  सोनाली नाईकवाडी यांनी पक्षातून बंडखोरी करून स्वतंत्र शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि सुरुवातीपासूनच 17 पैकी 12 नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला होता माधुरी शेणकर या नगरसेविका अंतिम टप्प्यात पिचड यांच्याकडे गेल्या वैष्णवी धुमाळ यांच्या बाजूने भाजपचे अधिकृत पाच नगरसेवक आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा पाठिंबा होता 

सोनाली नाईकवाडी यांच्या पाठीशी भाजप मधील बहुसंख्य नगरसेवकांसह शिवसेना आणि इतर नगरसेवकांनी सुद्धा उघडपणे भूमिका घेतल्याने त्यांचा विजय एकतर्फी झाला 

वैभव पिचड  यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेत सोनाली नाईकवाडी यांना पाठिंबा दिला त्यामुळे अकोल्यातील भाजपच्या राजकारणात मोठी उलथा पालथ झाल्याने   राजकीय वर्तुळात या निवडणुकीची चर्चा सूरू आहे 

 सोनाली नाईकवाडी यांनी वैभव पिचड यांच्या नेतृ्वाखाली भाजपच्या विविध तालुका व जिल्हा स्तरावरील विविध पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत मात्र या निवडणुकीत त्यांनी वैभव पिचड यांचे आदेश झुगारून लावले आणि स्वतंत्र शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदाची माळ आपल्या गळ्यात खेचून आणली 

 नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी अकोले शहरात जल्लोष साजरा केला गुलालाची उधळण फटाक्यांची आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला नगरपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं विशेष खबरदारी घेतली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button