सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त राजूर शहरात “रन फॉर युनिटी – एकता दौड” कार्यक्रम

राजूर/प्रतिनिधी
आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने अकोले तालुक्यातील राजूर पोलीस स्टेशनच्या वतीने राजूर शहरात राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त “रन फॉर युनिटी – एकता दौड” कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे ,राजुर चे उपसरपंच संतोष बनसोडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे उपनिरीक्षक विलास माळवदे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रारंभ केला तसेच आयटीआय चे प्राचार्य ऐ. सी. नागरे, वरिष्ठ निदेशक एस के मंडलिक यावेळी उपस्थित होते .

आमदार लहामटे यांनी राष्ट्रीय एकता दौड बाबत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.तसेच एकता दौड मध्ये सहभाग नोंदवून उत्सव वाढवला सदर एकता दौंड मार्ग ITI कॉलेज पिचड बंगला -महादेव मंदिर बाजरपेठ -जुना नाट्य चौक -दत्त मंदिर -पोलीस स्टेशन चौक -पिचड बंगला -ITI कॉलेज, या मार्गे पार पडत समारोप झाला
या कार्यक्रमासाठी राजूर पोलीस स्टेशनचे तीन पोलीस अधिकारी व 15 पोलीस अंमलदार, तसेच सत्वसील करिअर अकॅडमीचे 2 शिक्षक व 70 विद्यार्थी तसेच सर्वोदय विद्या मंदिर राजूर शाळेचे 9 शिक्षक व 100 विद्यार्थी उपस्थित होते.याशिवाय राजूर शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


