इतरसामाजिक

2500 झाडांच्या लागवड व संगोपनाच्या घनवन प्रकल्पाचे   मुसळगाव येथे उदघाटन उत्साहात पार पडले.

 नाशिक प्रतिनिधि

   पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व  वृक्ष संवर्धन  करण्याचे महत्त्व लक्षात घेऊन अरण्यऋषी पद्मश्री स्व. मारुती चितमपल्ली यांच्या स्मृती प्रित्यर्थ राबविण्यात येत असलेल्या 2500 झाडांच्या लागवड व संगोपनाच्या घनवन प्रकल्पाचे उदघाटन  मुसळगाव येथे उत्साहात पार पडले.

    हा प्रकल्प रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या पुढाकारातून व  रिंग प्लस ॲक्वा लिमिटेडच्या CSR निधीतून साकारण्यात आला आहे. प्रकल्पासाठी लागणारी जागा सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत मर्या. व ग्रामपंचायत मुसळगाव यांच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आली आहे.  तसेच वृक्षलागवड ते संगोपनापर्यंतची  संपूर्ण जबाबदारी वानप्रस्थ फाउंडेशनने स्वीकारलेले असून घनदाट वन निर्माण करण्याचे ध्येय या प्रकल्पामागे आहे.

 या उद्घाटन प्रसंगी  मुख्य अतिथी म्हणून यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनावणे व रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल रोटेरियन ज्ञानेश्वर शेवाळे उपस्थित होते. या मान्यवरांनी प्रकल्पाची पाहणी करून वृक्षारोपण केले व वानप्रस्थ फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले.

  यावेळी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष रोटेरियन डॉ. गौरव सामनेरकर यांनी प्रकल्पाची माहिती सादर केली. तसेच व्हाईस प्रेसिडेंट रोटेरियन हेमराज राजपूत, सचिव रोटेरियन रेखा पटवर्धन, प्रोजेक्ट सेक्रेटरी रोटेरियन मकरंद चिंधडे, प्रेसिडेंट इलेक्ट रोटेरियन शिल्पा पारख, रोटेरियन विजय दीक्षित व रोटेरियन रोहित देशपांडे उपस्थित होते.

स्थानिक मान्यवरांमध्ये श्री सचिन शिरसाट (उपसरपंच, मुसळगाव), श्री नामकर्ण आवारे (संचालक, स्टाईस मुसळगाव), श्री किशोर राठी (संचालक, अॅडव्हान्स एंझाइम्स), रिंग प्लस ॲक्वा चे उत्तम सोनावणे व नानासाहेब कोलगे यांची उपस्थिती होती.

घनवन प्रकल्पामुळे मुसळगाव परिसरात पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळणार असून, पुढील काही वर्षांत हे क्षेत्र हरित आणि जैवविविधतेने समृद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button