रणद बुद्रुक ता अकोले येथे शेतकऱ्यांना भाजीपाला , गहू, हरभरा लागवड प्रशिक्षण .

एस के जाधव
कोकणवाडी ता अकोले
दिनांक 21 ऑक्टोबर २०२५ रोजी, ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई पुरस्कृत आणि बायफ (BISLD), नाशिक संचलित समृद्ध किसान प्रकल्प अंतर्गत रणद बुद्रुक येथे भाजीपाला लागवड, गहू, हरभरा लागवड प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रशिक्षणाला गावातील महिला, पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित 12 शेतकरी यांना मिरची चे रोपे देण्यात आली.
बायफचे श्री. राम कोतवाल यांनी मिरची लागवड, मिरचीतील लागवडीचे अंतर, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तणनियंत्रण, आंतरमशागतीचे कामे, किडरोग नियंत्रण, काढणी संदर्भात माहिती देण्यात आली.तसेच हरभरा, व गहू बियाणे शेतकरी यांना देण्यात आले. तसेच औषधे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन ए.एस.के. फाऊंडेशनचे श्री. सिद्धार्थ अय्यर व श्री. अरुण बांबळे आणि बायफचे श्री. प्रदीप खोसे, श्री सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बायफ चे राम कोतवाल, विष्णु चोखंडे, काजल देशमुख, मारुती सगभोर यांनी केले.
हा प्रकल्प राबविण्यासाठी महत्त्वाची मोठा देव ग्राम विकास समिती यांनी पार पाडली.कमिटीचे अध्यक्ष, सचिव सदस्य, मधुकर पटेकर, सरपंच सुंदरलाल भोईर, यांनी संस्थेचे व ए. एस. के. फाऊंडेशन चे आभार मानले.



