राजूर येथील सर्वोदय विद्यालयात कायदे विषयक शिबीर संपन्न.

गरिबीतून श्रीमंत होण्याचा एकच मार्ग फक्त शिक्षण घेणे- न्यायमुर्ती न्याहारकर.
योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले तर आयुष्य घडते- ए.पी.आय.किशोर पवार.
अकोले/प्रतिनिधी–
परिस्थिती माणसाला जीवन जगायला शिकवते.जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा आयुष्याची लढाई सुरू होते.गरिबिची कारणे शोधा.गरिबितून श्रीमंत होण्याचा एकच मार्ग फक्त शिक्षण घेणे.असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश एस.यू.न्याहारकर यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती अकोले,राजूर न्यायालय तसेच अकोले,राजूर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कायदे विषयक शिबीर गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथे संपन्न झाले.
यावेळी न्यायमुर्ती न्याहारकर विचार मंच्यावरून बोलत होते. याप्रसंगी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव एम.एल.मुठे,संचालक विजय पवार,राजूर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. किशोर पवार, अॅड.दत्तात्रय निगळे,सामाजीक कार्यकर्ते विनय सावंत,कनिष्ठ लिपीक एस.ए.शिंदे,डी.सी.उदागे, वरिष्ठ लिपीक एस.डी.पानसंबळ,सहाय्यक सरकारी वकील एस.वाय.वाकचौरे, तालुका वकील संघाचे सदस्य टी.टी.पवार,गवांदे मॅडम, दिघे मॅडम उपस्थित होते.
न्यायमुर्ती न्याहारकर यांनी पुढे मार्गदर्शन करताना अपयश आले खचून जाऊ नका.काळ येतो,जातो.रात्री नंतर दिवस येतो.स्वतःच्या चुका लपवू नका.वेदनांना आपली ताकद बनवा. प्रेम प्रासंगीक असावे. मैत्री अभ्यासपुर्ण असावी.महिलांचा आदर करा.असे प्रतिपादन केले.

ए.पी.आय.किशोर पवार यांनी तरुण वर्ग भरकटत चालला आहे.मोबाईलचा अतिवापर टाळा.कामाची लाज वाटू देवू नका.जीवनात ध्येय ठरवा. क्षेत्र योग्य निवडा. तुमची काळजी तुम्ही घ्या.वयाची मर्यादा बाळगा. स्वतःच्या पायावर उभे रहा.योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले तर आयुष्य घडते असे विचार प्रतिपादीत केले.
यावेळा विनय सावंत, अॅड. दत्तात्रय निगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी केले. सुत्रसंचालन शरद तुपविहिरे यांनी केले.तर उपप्राचार्य दिपक बुऱ्हाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कष्टाची जाणीव असावी.भारतीय राज्यघटनेने व्यक्ती स्वातंत्र्य दिले.पण मर्यादा आहेत.पळून जाण्यापुर्वी एकदा आई वडीलांचा विचार करा. जोडीदार योग्य निवडा.ज्यांनी आपल्यासाठी खस्ता खाल्यात त्यांचा विश्वासघात करू नका- विनय सावंत
वयाचा विचार महत्त्वाचा असून बालविवाह थांबवा.बंधन पाळा.जबाबदारीचे भान ठेवा. कुटूंब उद्वस्त करू नका. घरच्यांना दुखवू नका,शिक्षेस पात्र ठरू नका -अॅड. दत्तात्रय निगळे




