कु.समिक्षा लगड हिची राष्ट्रीय स्पर्धांसाठी महाराष्ट्र हॉकी संघात निवड.

अकोले प्रतिनिधी
प्रवरा कन्या विद्यामंदिरचा संघ विभागीय नेहरू हॉकी स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झाला तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला .
पुणे विभागीय नेहरू हॉकी वयोगट स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेमध्ये प्रवरा कन्या विद्यामंदिर व पुणे शहर यांच्यात झालेल्या सामना अतिशय चुरशीचा ठरला.प्रवरा कन्या विद्यामंदिरच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे
संघ विजय ठरला. तसेच स्पर्धेमध्ये सेमी फायनल सोलापूर ग्रामीण सोबत 5:0 विद्यालयाच्या संघाने आघाडी घेतली व अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामना पुणे ग्रामीण बारामती यांच्यासोबत झाला.या अंतिम सामन्यांमध्ये विद्यालयाच्या संघाने नगर जिल्ह्याचे नेतृत्व करत पुणे बारामती संघासोबत विजयी ठरला. विद्यालयाचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे विभागाचे नेतृत्व करणार आहे.या संघामध्ये कु. समीक्षा रोहिदास लगड(कॅप्टन ) हिची सांगली इस्लामपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धांत मध्य प्रदेश ग्वालीयर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांत महाराष्ट्र

हॉकी संघात निवड झाली आहे.या खेळाडूस विद्यालयाच्या प्राचार्य व क्रीडा शिक्षिका विद्या घोरपडे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये व कोच कल्पना कडू यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. स्विमिंग कोच सुचित्रा तांबे यांचे सहकार्य लाभले . तसेच प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या कॅम्पस डायरेक्टर व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका सरोदे मॅडम व विद्यालयाच्या प्राचार्या कुमकर मॅडम यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले कु.समिक्षा लगड ही अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील रहिवाशी असून ती लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर येथे शिक्षण घेत आहे. विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

[ जीवनात शांतता तसेच संयम असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होतात.शांततेच्या मार्गाने मिळवलेले यश हे सर्वोच्च असते.समिक्षाने मिळविलेले हे यश कुटूंबासाठी फारच अभिमानास्पद आहे.शुन्यातल्या कुटुंबातीलच मुले मोठी होतात याचे हे मुर्तीमंत उदाहरण आहे.-रोहिदास लगड (वडील)]


