आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२७/१२/२०२५,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ०६ शके १९४७
दिनांक :- २७/१२/२०२५,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०१,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:००,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- पौष
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- सप्तमी समाप्ति १३:१०,
नक्षत्र :- पूर्वाभाद्रपदा समाप्ति ०९:१०,
योग :- व्यतीपात समाप्ति १२:२२,
करण :- विष्टि समाप्ति २४:४०,
चंद्र राशि :- मीन,
रविराशि – नक्षत्र :- धनु – मूळ,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- व्यतीपात वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:४६ ते ११:०८ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:२३ ते ०९:४६ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:५३ ते ०३:१५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:१५ ते ०४:३८ पर्यंत,
❀ दिन विशेष:
भद्रा १३:१० नं. २४:४० प., अष्टमी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ०६ शके १९४७
दिनांक = २७/१२/२०२५
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. अति तिखट पदार्थ खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल.
वृषभ
तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाचनातून वैचारिकता सुधारेल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल. प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल.
मिथुन
नोकरीत वरचष्मा राहील. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील. तत्काल निर्णयावर येऊ नका. सारासार विचारावर भर द्यावा.
कर्क
हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल. अधिकार्यांवर छाप पाडता येईल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा.
सिंह
सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका. आवडीचे पदार्थ चाखाल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल.
कन्या
आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. रुचकर भोजनाचा आनंद घ्याल.
तूळ
योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. उगाच फार काळजी करत बसू नका. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका. पोटाचे विकार जाणवू शकतात. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल.
वृश्चिक
लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. एखादी बहुमूल्य वस्तु मिळण्याचे संकेत मिळतील. नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल. साहस आणि पराक्रमात वाढ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल.
धनू
सामाजिक कामाची ओढ लागेल. घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील. प्रलंबित येणी मिळतील.
मकर
मन:शांति लाभेल. जुन्या चिंता मिटतील. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल.
कुंभ
नवीन गुंतवणूक करता येईल. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये. नसत्या भानगडीत अडकू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
मीन
बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचनाचा त्रास संभवतो. अति साहस करायला जाऊ नका.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



