इतर

सुपा गावासाठी धोकादायक ठरणारी गॅस पाइपलाइन उखडून टाका


दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:-

पारनेर रोड साईड पट्टी सह रस्त्यावर मुरुम टाकून वाहतूक व्यवस्था तसेच सुपा येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक पद्धतीने टाकली जाणारी अवैध गॅस पाइपलाइन त्वरित काढून टाकावी अशी मागणी इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाप्रमुख अविनाश पवार यांनी केली आहे

रस्त्यांची खराबी करून अपघातास तसेच रस्ता सुरक्षेसाठी धोका निर्माण करणाऱ्या संबंधित एजन्सी वर गुन्हा दाखल करुन यंत्र सामग्री जप्त करून त्वरित दंडात्मक कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सुपा गावांसह रस्ता सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार न केल्यास मनसे स्टाईल तिव्र स्वरुपात आंदोलन करण्यात येईल

यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी आपले कार्यालय जिम्मेदार राहील असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाप्रमुख अविनाश पवार यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button