इतर

नवरदेव पहायला चिखलीत महिलांची गर्दी!

अकोले प्रतिनिधी

शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित पत्रकार निरंजन देशमुख यांनी,  निर्माण केलेल्या नवरदेव चित्रपटाला संगमनेर तालुक्यातील चिखली गावात महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, गावातीलच कलेक्टर्स हायस्कूलच्या पटांगणावर एलईडी स्क्रीन वर चित्रपट प्रदर्शित केला गेला

सरपंच सौ. रत्नमाला अण्णासाहेब हासे, आणि विजयराव देशमुख , विकास हासे, अरुणराव हासे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चित्रपट दाखविला गेला, बाळासाहे माने यांचा यावेळी सन्मान केला गेला, मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ग्रामीण भागात गावोगावी प्रदर्शित

करण्यामागचा हेतू म्हणजे गावातील शेतकरी मुलांची लग्न रखडली असून, ही समस्या गंभीर बनत चालल्याने या विषयावर जनजागृती होणे ग्रामीण भागात गरजेचे असल्याने त्याची गरज ओळखून हा चित्रपट गावोगावी दाखविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक लेखक गीतकार निरंजन देशमुख यांनी घेतला आणि विशेष म्हणजे विनामूल्य हा चित्रपट गावोगावी दाखविला जात आहे.

 शेतकरी मुलांचे लग्न व्हावीत त्याचबरोबर शेतकरी मुलांकडे आणि शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन मुलींच्या आई-वडिलांचा आणि मुलींचा बदलावा या प्रामाणिक हेतूने हे कार्य नवरदेव चित्रपटाच्या माध्यमातून केले जात आहे. ग्रामीण भागात या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विशेष म्हणजे महिला भगिनींची खंबीर साथ या चित्रपटाला मिळत असल्याने शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर हा चित्रपट प्रभावी गुणकारी ठरत आहे. 

दोन तास पंचवीस मिनिटांच्या या चित्रपटात चार विषयानुरू गाणे असून प्रेक्षकांच्या पसंतीस हा चित्रपट उतरला आहे. चिखली येथील महिला भगिनींनी चित्रपट पाहिल्यानंतर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. चिखली गावात या चित्रपटाचा 69 वा शो संपन्न झाला, महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी या चित्रपटाचे आयोजन सामाजिक बांधिलकीतून करायचे असल्याचे  पत्रकार निरंजन देशमुख यांनी यावेळी सांगितले  

*जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी चित्रालय थेटर लोणी येथे, तर संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी गंगाधर मल्टिप्लेक्स थेटर सिन्नर येथे आणि सौ. पुष्पाताई लहामटे यांनी अगस्ती थेटर अकोले येथे नवरदेव चित्रपट बघितला आहे, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील आघाडीच्या महिला भगिनींनी देखील नवरदेव चित्रपट मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये आणि गावोगावी एलईडी स्क्रीनवर बघितला आहे आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत, सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरत असलेला नवरदेव चित्रपट शेतकरी बांधवांचा आस्थेचा विषय बनला आहे

———–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button