इतर

कोतुळ ते शिर्डी पायी दिंडी सोहळ्याचे रविवारी प्रस्तान 

कोतुळ प्रतिनिधी 

अकोले  तालुक्यातील कोतुळ पंचक्रोशीतील भाविकांच्या कोतुळ ते शिर्डी या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन दरवर्षीप्रमाणे  यावर्षी ही  करण्यात आले आहे 

रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी या दिंडीचे कोतुळ येथून प्रस्थान होणार आहे रविवारी सकाळी नऊ वाजता श्री दत्त मंदिर  कोतुळ येथून या दिंडीचे प्रस्थान होणार असून कोतू ळ पंचक्रोशीतील भाविक या दिंडीत सहभागी होणार आहेत कोतूळ, निमगाव पागा, वडगाव फाटा,काकडी मार्गे बुधवार दिनांक 31 डिसेंबर रोजी शिर्डी येथे हा पायी दिंडी सोहळा पोहोचणार आहे   

 गुरुवार दिनांक एक जानेवारी 2026 रोजी सायंकाळी पाच वाजता कोतूळ येथील सातेवाडी रोडवर देशमाने वस्ती येथे या दिंडी सोहळ्याची सांगता व महाप्रसाद होणार आहे दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री साई सेवा परिवार सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button