इतर

जायनावाडी, बिताका, गावात एकल महिलांना आदिवासी फडकी वाटप.

अकोले/प्रतिनिधी 

        अकोले तालुक्यातील दुर्गम भागात असलेले व जिल्हा हद्दीवरील सर्वात शेवटचे गाव जायनावाडी, बिताका येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत जायनावाडी बिताका येथे विधवा एकल महिलांना फडकी वाटप करण्यात आले.

ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या एकल महिलांचा विकास व विविध योजनांचा लाभ एकल महिलांना मिळवून देणे या उद्देशाने गावातील एकल महिलांची माहिती ग्रामपंचायत स्तरावर संकलित करण्यात आली.यानंतर ग्रामपंचायत जायनावाडी  व बिताका यांनी १५ टक्के महिला व बालविकास खर्च अंतर्गत तरतुदी नुसार गावातील सर्वेक्षण करण्यात आलेल्या एकल महिलांना आदिवासी फडकी वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले.

अशा प्रकारे जायनावाडी व बिताका या दोन्ही गावातील सर्व एकल महिलांना हा लाभ देण्यात आला.यापुढेही एकल महिलांचा विकास होणेकामी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महिला बचत गट,विविध योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील राहील असे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.

एकल महिलांच्या विकासासाठी एकत्र येऊन बचत गटातून विविध उपाययोजना उद्योग सुरु करण्यात आले पाहिजे.आपण आपल्या गटातून विविध व्यवसाय सुरू करून त्याचे विस्तारीकरण बाहेर कसे होईल हे सांगण्यात आले.

     यावेळी उपस्थित ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विशाल धांडे,पेसा अध्यक्ष काळू भांगरे, रोहिदास भांगरे,सोमनाथ भांगरे,अशोक भांगरे, पांडुरंग भांगरे,गोरख भांगरे,विठ्ठल पेढेकर, ग्रामपंचायत कर्मचारी,शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती गवळी,अंगणवाडी सेविका अलका भांगरे, व जायनावाडी बिताका येथील एकल महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी विशाल धांडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button