अवैध दारूचे संगमनेर कनेक्शन, राजूर पोलिसांची कारवाई!

डस्टर गाडीतून देशी दारूची वाहतूक,
साडे पाच लाख मुद्देमाल जप्त.
विलास तुपे /राजूर प्रतिनिधी
राजूर पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणारी डस्टर गाडी व आरोपीला ताब्यात घेत साडे पाच लाख चा मुद्देमाल जप्त केला
26/12/2025 रोजी रोजी रात्री 09.30 वा चे सुमारास गुप्त बातमी मिळाली की एक सफेद रंगाची विना नंबरची डस्टर गाडी ही राजुर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध्य रित्या दारुची वाहतुक करत आहे राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार व पोलीस कर्मचारी यांनी खाजगी वाहनाने राजुर गावातील खडकी रोडवर खात्री करण्यासाठी थांबले असता एक सफेद रंगाची विनानंबरची डस्टर गाडी भरधाव वेगाने खडकी रोडकडे जात असताना दिसली व सदर गाडीचा संशय आल्याने गाडी थांबवुन गाडी ची पाहणी केली असता डस्टर गाडी मध्ये अवैध्य रित्या देशी दारुची 11 बॉक्स मिळुन आले सदरची गाडी पोलीस स्टेशनला आणुन सदर वाहना वरील इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सनिल भाऊसाहेब तोरमल (वय 28 वर्षे) रा अंबड ता अकोले असे असून सदरचे वाहना बाबत व अवैध्य देशी दारु चे बॉक्स कोठुन आणले या बाबत विचारले असता त्याने सागितले की सदर चे वाहन हे वैभव नवले रा इंदोरी ता अकोले याचे असुन त्याचे सांगणे वरुन मी संगमनेर येथील बबलु शेठ याच्या दुकानातुन सदर माल गाडीत भरुन आणुन मी खडकी येथे देणार होता असे सागितले
राजुर पोलीस स्टेशन ला याबाबत गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयात आरोपीत 1) सनिल भाऊसाहेब तोरमल वय 28 वर्षे रा अंबड ता अकोले याचे ताब्यातुन खालील प्रमाणे प्रोव्हीशन गुन्हयाचा माल मिळुन आला असुन आरोपी क्र 2 वैभव नवले रा इंदोरी ता अकोले 3) बबलु शेठ रा संगमनेर हे फरार आहेत जप्त प्रोव्हीशन गुन्हयातील मालाचे वर्णन खालील प्रमाणे. 1) 38400/- रु कि च्या देशी बाँबी संजा कंपनीच्या 180 एम एल ची सिलबंद 480 बॉटल प्रत्येकी 80 /- रु कि 2)3960/- रु किच्या देशी बाँबी संञा कंपनीच्या 90 एम एल ची सिलबंद 99 बॉटल प्रत्येकी 40 /- रु कि3) 5,00,000/- रुपये किंतीची पांढ-या रंगाची रेनॉल्ट डस्टर कंपनीची डस्टर गाडी (गाडी नंबर नसलेली)एकुण 05,42,360/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे करण्यात आला असुन पुढील कायदेशिर कारवाई करीत आहोत
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे श्रीरामपुर यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.कुणाल सोनवणे मा उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांचे सुचने वरुन स .पो नि किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक विलास माळवदे , पो हेकाँ रविद्रं वलवे, पो.काँ सचिन शिंदे, पो.काँ विजय काळे म पो काँ उषा मुठे, पो.काँ परते, पो काँ मुठे याचे पथकाने कारवाई केली असून पुढील तपास चालू आहे


