इतर

आजचे पंचांग राशी भविष्य दि.०३/०२/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ १४ शके १९४७
दिनांक :- ०३/०२/२०२६,
वार :- भौमवासरे(मंगळवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०३,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:२३,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- द्वितीया समाप्ति २४:४१,
नक्षत्र :- मघा समाप्ति २२:११,
योग :- शोभन समाप्ति २६:३९,
करण :- तैतिल समाप्ति १३:१२,
चंद्र राशि :- सिंह
रविराशि – नक्षत्र :- मकर – श्रवण,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- बुध – कुंभ २१:५२,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:३३ ते ०४:५८ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ११:१८ ते १२:४३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:४३ ते ०२:०८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३३ ते ०४:५८ पर्यंत,

❀ दिन विशेष:
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ १४ शके १९४७
दिनांक = ०३/०२/२०२६
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. नवीन ओळखी वाढतील. गप्पांच्या मैफलीत रमून जाल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी.

वृषभ
कामात स्त्री वर्गाची मदत लाभेल. कमिशन मधून फायदा संभवतो. स्थावरच्या कामात लाभ होईल. जुनी येणी वसूल होतील. कलेचे योग्य मूल्यमापन केले जाईल.

मिथुन
चैनीच्या वस्तु खरेदी कराल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. तुमच्या कलेला चांगली प्रसिद्धी मिळेल. व्यावसायिक वातावरण चांगले राहील. मनाजोगी खरेदी कराल.

कर्क
मानसिक चंचलता जाणवेल. कल्पना शक्तीला वाव देता येईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वाचनाची आवड जोपासाल. परोपकारी दृष्टीकोन ठेवाल.

सिंह
जुन्या कामातून लाभ संभवतो. रेस-सत्ता यांतून लाभाची शक्यता. काही कामे विनासायास पार पडतील. कामाचा आनंद घेता येईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष ठेवा.

कन्या
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. संपर्कातील लोकांचा सहवास वाढेल. भागिदारीतून चांगली कमाई होईल. कामाचे योग्य नियोजन करावे. घरगुती गोष्टींमध्ये अधिक लक्ष्य घाला.

तूळ
हातातील अधिकाराची योग्य जाणीव ठेवा. क्वचित प्रसंगी टीका होऊ शकते. स्व-मतावर आग्रही राहाल. कानाचे त्रास संभवतात. भावंडांची बाजू जाणून घ्यावी.

वृश्चिक
बोलण्याच्या भरात जबाबदारी घ्याल. दिवस खटपटीत जाईल. लहरीपणाने वागू नका. दूर दृष्टीकोन ठेवावा लागेल. कष्टाला घाबरू नका.

धनू
स्व-बळावर कामे हाती घ्याल. आत्मविश्वास वाढीस लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी. स्वातंत्र्यप्रियता दर्शवाल.

मकर
सामुदायिक वादात अडकू नका. गैर-समजुती मुळे त्रास संभवतो. डोळ्यांची योग्य काळजी घ्यावी. उधार-उसनवारीचे व्यवहार सतर्कतेने करावेत. काही कामे खिळून पडू शकतात.

कुंभ
कामाचा ताण जाणवेल. मुलांची चिंता लागून राहील. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल. मनातील प्रबळ इच्छेला महत्व द्यावे. प्रयत्नात कसूर करू नका.

मीन
काही अनपेक्षित बदल घडू शकतात. वडीलांचे मत विरोधी वाटू शकते. प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. हटवादीपणा करू नये. दर्जा टिकवण्याची धडपड कराल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button