अकोले तालुक्यातील रामवाडी( एकदरे) येथील हरिनाम सप्ताहाची सांगता.

एस के जाधव
प्रतिनिधी /कोकणवाडी
अकोले तालुक्यातील रामवाडी (एकदरे) येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. गावकऱ्यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडत असतो. या सप्ताहासाठी थोर महात्म्यांचे सुश्राव्य हरी किर्तन, हरिपाठ काकडा भजन, जागर होत असतो. भाविक मोठ्या संख्येने श्रवण सुखाचा लाभ घेत असतात.
ह. भ. प. दिनेश महाराज भोईर (वाशिंद ) ता.शहापूर जि. ठाणे यांनी काल्याची कीर्तन सेवा पार पाडली. भगवान श्रीकृष्णाच्या लिलेबरोबर समाज प्रबोधनी केले. भगवंताच्या नामस्मरणाचे महत्व, विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्यासारखी गुणी माणसं महत्त्वाची आहेत.

यावेळी सार्थक संतोष भांगरे व यश भगवंता भांगरे यांनी महाराजांच्या हस्ते तुळशी माळ घालून वारकरी संप्रदायात पदार्पण केले. असा बदल घडणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
गळ्यात पवित्र तुळशीमाळ घालावी भगवंताचे नामस्मरण करत पंढरी, आळंदीची, त्र्यंबकेश्वर ची वारी करावी आपल्या जीवनाच सार्थक करून घ्यावे, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा उद्धार होईल.
या नाम यज्ञामध्ये ह. भ. प. चैतन्य गिरी महाराज, ह. भ. प. तेजश्री ताई कुंदे, ह. भ. प. रामदास महाराज सहाणे यांनी हरिकीर्तन सेवा केली तसेच ह.भ.प. संतु महाराज जाधव यांनी तीन दिवस प्रवचन सेवा बजावली. काकडा भजनासाठी ह.भ. प. भीमा महाराज इदे, ह. भ. प. पंढरी महाराज चौरे, ह.भ.प. यशवंत महाराज बेंडकोळी, गायनाचार्य ह. भ. प. रोहिदास महाराज दोन्नर, कृष्णा महाराज ढोन्नर यांनी आपल्या गायनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. हार्मोनियम ची साथ मारुती भांगरे, विष्णू जाधव यांनी दिली. संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ, मिराबाई भांगरे व गावकऱ्यांनी हरिपाठ घेतला

मृदुंगाचार्य खुशाल महाराज डगळे व विशाल महाराज भांगरे, विणेकरी गणपत महाराज, चोपदार मंगाजी महाराज कोरडे, आचारी एकनाथ खोकले यांनी सेवा बजावल्या. अंबिका साऊंड सिस्टिम चे श्री देवराम भांगरे यांनी आवाज दूरपर्यंत पोहोचवला.
सप्ताह साठी विशेष कामगिरी करणाऱ्यांचे स्वागत आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये ज्ञानेश्वर घुगे, दिलीप गोसावी, बळीराम शेलवले, दिपालीताई गोसावी, अंजनाताई भोईर, गायक रोहीदास ढोन्नर, कृष्णा ढोन्नर, नवनाथ भांगरे, खंडू भांगरे, मच्छिंद्र धोंगडे, अरुण भांगरे, विलास गणपत भांगरे, रामदास भांगरे, खुशाल डगळे, विशाल भांगरे, भिमा ईदे शिवराम भांगरे, भीमा बेनके, एकनाथ खोकले, देवराम भांगरे, मिराबाई भांगरे, लालू भांगरे, दगडू चंदगीर, इंदुबाई भांगरे, माजी उपसभापती विठ्ठल भांगरे, देवराम जाधव, महादर्पणचे प्रतिनिधी संतु जाधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
काल्याचा महाप्रसाद उरकल्यानंतर दुपारी तीन वाजता दिंडी सोहळा संपन्न झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी चे श्री किरण शिरोळे सरांनी सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.


