पिंपळदरी येथे ‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ व ग्रंथालयाचे उद्घाटन

अकोले प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळदरी (ता. अकोले, जि. अहिल्यानगर) येथे शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ आणि सुसज्ज ग्रंथालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाचे औचित्य साधून शिखांचे नववे गुरू तेग बहादूर यांची ३५० वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली,
कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक आणि उत्साही वातावरणात काढण्यात आलेल्या ‘ग्रंथदिंडी’ ने झाली. मुलांनी हातात विविध पुस्तके आणि वाचन संस्कृतीचे संदेश देणारे फलक घेऊन गावातून दिंडी काढली, जी ग्रामस्थांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. या वाचन अभियानाचे उद्घाटन अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावाचे मा. सरपंच श्री. हौशिराम रंधे होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संभाजी झावरे (लिंगदेव बीट विस्तार अधिकारी), देवेंद्र आंबेटकर (लिंगदेव केंद्रप्रमुख, केंद्र) उपस्थित होते.
गटविकास अधिकारी अमर माने यांनी स्वत: ग्रंथ दिंडीची पालखी खांद्यावर घेत ग्रंथदिंडीत सहभाग घेतला. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले की, मोबाईलच्या युगात पुस्तकांशी मैत्री करणे हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अनिवार्य आहे. “पुस्तके ही मानवाचा खरा मित्र आहेत. वाचनअभियानामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल.”असे संभाजी झावरे यांनी सांगितले

देवेंद्र आंबेटकर यांनी , “केवळ पाठ्यपुस्तके न वाचता अवांतर वाचन केल्यानेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो.” असे सांगितले माजी सरपंच राम सोपान रंधे यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या वतीने प्रितेज सुनील रंधे, पायल विकास रंधे यांनी मनोगत व्यक्त केले ‘
या सोहळ्याचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्री.आबाजी भांगरे यांनी केले. मुख्याध्यापक श्री. धिंदळे चंदर भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी. बांडे भागवत, सुनिता कासार नितीन केंगार, बाळू भांगरे, यांनी विशेष परिश्रम घेतले.
श्री.विकास रंधे (का.पो.पाटील),श्री.प्रदिप मांडे (संचालक वि.का. सोसायटी पिंपळदरी),श्री.बाळासाहेब मांडे ,श्री.सुनिल रंधे, श्री.गणेश गायकर ,श्री.पंढरीनाथ रंधे ,श्री.गोरक्षनाथ रंधे ,श्री.कचरू पांदे ,श्री.मनोहर रंधे श्री.सागर मांडे ,श्री.रमेश नेपाळे ,श्री.सुदाम रंधे, सौ.प्रतिभा पाटील , सौ.कविता थोरात,सौ.विमल रंधे , सौ.रेश्मा नेपाळे आदि विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते
——===—



