राजूर येथे विद्यार्थ्यांने वाचवले बगळ्याचे प्राण

राजूर प्रतिनिधी
कुत्र्याच्या भक्षस्थानी पडणाऱ्या बगळ्याचे शालेय शालेय विद्यार्थ्यांनी तत्परता दाखवून बगळ्याची प्राण वाचवले ची घटना राजूर (ता अकोले) येथे घडली
कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये बगळ्याची मादी भक्षस्थानी पडण्याअगोदरच श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी उमेर आयाज खाटीक याने कुत्र्यांवर जोरदार हल्ला करून बगळा पक्ष्याच्या मादिचे प्राण वाचवले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नुकतेच चिमणी वाचवा अभियानाच्या अंतर्गत विद्यालयांमध्ये शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी चिमण्यासाठी घरटे बनवून त्यांना अन्न व पाण्याचे सुविधा शाळेतही केली व घराच्या छतावरही केली.अशा उपक्रमांमधून प्रेरित होऊन विद्यार्थ्यांमध्ये प्राणिमात्रांबद्दल प्रचंड प्रेम, आस्था, आपुलकी निर्माण झालेली आहे. त्याचाच परिचय या बगळ्याचे प्राण वाचवण्यामधून दिसून येतो. अतिशय निर्भीड व आक्रमकपणे उमेरने कुत्र्यांना हल्ल्यापासून थांबवले,त्यांचा प्रतिकार केला व मुक्या पक्षाचे प्राण वाचविले. प्राणीमात्राबद्दल दया, प्रेम बाळगणे हीच खरी माणुसकी आहे असे वाचवलेल्या पक्षाच्या बाबतीत दिसून आले.त्या पक्षाला भक्षस्थानी पडत असताना जीवदान दिले.विद्यालयात आणून पाणी पाजले, सुरक्षित ठिकाणी ठेवले. प्रा.किरण भागवत व शिक्षकांच्या मदतीच्या उपचार केले. तात्काळ संवेदनशीलतेने मिळालेल्या आधार व उपचारामुळे काही वेळात पक्षी सावध झाला.

प्राचार्य किरण भागवत यांनी वनक्षेत्रपाल पडवळे यांना त्वरित संपर्क करून घडलेल्या घटनेची माहिती दिली व बगळ्याची मादी या पक्षाचे उपचार व संगोपनासाठी विचारणा केली. त्यांनीही त्वरित वन कर्मचारी संतोष दिघे यांना पाठवून पक्षाला ताब्यात घेतले. त्यावर त्वरित उपचार करून बरे वाटल्यानंतर त्याला पुन्हा निळवंडे धरणाच्या पाणथळ नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल असे सांगितले.उमेरच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेचे सचिव शांताराम काळे, संतोष बनसोडे, प्रा किरण भागवत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. या घटनेमुळे इतर विद्यार्थ्यांनाही त्याचे अभिनंदन केले. प्राणी व पक्षांबद्दल करुणा बाळगण्याची यामुळे प्रेरणा मिळाली. वनविभागातून लवकरात त्याला तंदुरुस्त करून निसर्गात सोडले जाईल असे विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंदाने जल्लोष केला. विद्यालयाच्या प्रभावशाली उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जी मूल्य रुजलेली आहेत ती बघून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांचे कौतुक केले.



