इतर

प्रस्तावित राजुर अप्पर तहसील क्षेत्रात कोतुळ गावाचा समावेश करू नका गाव बंद ठेऊन ग्रामस्थांनी नोंदविला विरोध

कोतुळ प्रतिनिधी

प्रस्तावित राजुर अप्पर तहसील कार्यालयाच्या क्षेत्रात कोतुळ गावाचा समावेश करण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाआहे

चार दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामसभेतही याला विरोध केल्यानंतर काल मंगळवारी कोतुळ गाव बंद ठेवून या निर्णयाचा निषेध नोंदवत विरोध करण्यात आला

कोतुळ गावाचा राजुर अप्पर तहसील कार्यालयाच्या क्षेत्रात समावेश करू नये असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला मंगळवारी कोतुळ गावातील सर्व व्यवहार दुपार पर्यंत बंद ठेवण्यात आले.

राज्य शासनाने राज्यामध्ये 69 नवीन अप्पर तहसील कार्यालयाने निर्माण करण्याबाबत अध्यादेश काढला आहे यामध्ये अकोले तालुक्यासाठी राजुर येथे अप्पर तहसील कार्यालय प्रस्तावित करण्यात आलं असून संबंधित क्षेत्राच्या निर्मितीसाठी हरकती मागवण्यात आल्या याच पार्श्वभूमीवर कोतुळ ग्रामसभे मध्ये राजुर अप्पर तहसील कार्यालयाच्या क्षेत्रात समाविष्ट न होण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामस्थांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी कोतुळ गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले. त्यानंतर मुख्य चौका त जाहीर सभा घेण्यात आली

या सभेत सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी बी जे देशमुख जिल्हा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख,शंकर घोलप,सागर देशमुख, यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कोतुळ गाव सामाजिक सलोखा दैनंदिन व्यवहार, शैक्षणिक आणि संस्थात्मक संबंध तसेच दळणवळणाच्या दृष्टीने अकोल्याला जोडले आहे त्यामुळे या गावांचा समावेश अकोले तहसील कार्यालय क्षेत्रातच करण्यात यावा

आमदारांनी याबाबत आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट करावी अशी मागणी सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी बी जे देशमुख यांनी केली

प्रस्तावित रचनेनुसार राजुर अप्पर तहसील क्षेत्रात राजुर, कोतूळ, साकीरवाडी,वाकी,शेंडी, आणि खीरविरे या मंडळांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तर अकोले तहसील कार्यालय क्षेत्रात अकोले,ब्राह्मणवाडा, लिंगदेव, विरगाव, समशेरपुर, आणि रुंभोडी अशी मंडळ राहणार आहेत . तालुक्यामध्ये एकूण बारा मंडळांची रचना प्रस्तावित आहे

दैनंदिन व्यवहार अकोल्याशी जोडलेले असताना केवळ प्रशासकीय पुनर्रचनेच्या नावाखाली आम्हाला राजूरच्या क्षेत्रात का टाकलं जातंय असा सवाल उपस्थित करून या मागणीवर आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी जनतेच्या मागणी सोबत रहावे आमदार आमदारांनी ग्रामस्थांच्या मागणी सोबत रहावे अशी अशी भूमिका यावेळी बी जे देशमुख व सिताराम पाटील देशमुख यांनी यावेळी मांडली

====

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button