पिंपळगाव खांड मध्ये वीर महाराज मंदिराची दानपेटी फोडली!

कोतुळ प्रतिनिधि
अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथील जागृत वीर महाराज देवस्थानच्या मंदिराची दानपेटी चोरट्यांनी फोडून भाविकांच्या दानावर डल्ला मारला आहे आजसोमवारी पहाटे 12ते 01 वाजने दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली चोरट्यांनी तोंड कापडाने बांधलेली असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे
मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे ची तोडफोड करत दानपेटी फोडली मंदिराचा काही दिवसापूर्वी जीर्णोद्धार झाला होता भाविकांनी लोकवर्गणीतून भव्य असे मंदिर बांधकाम केले आहे या मंदिरात दान पेटीततील रकमेचा अध्याप अंदाज आला नसून मंदिरातील मोठी दानपेटीतील मोठे रक्कम तसेच चांदी नव सुवर्णं दान चोरी गेल्याची भीती व्यक्त होत आहे
रविवारी दुपारी मंदिर परिसरात चार अज्ञात व्यक्ती येऊन गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे या संशयित व्यक्तींची चौकशी केली जात आहे चोरट्यांनी पाळत ठेवून या मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला गावातील भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे असून पोलीस प्रशासनाने याचा ताबडतोब छडा लावा व आरोपींना जेर बंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे


